म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईत करोनाचा धोका कायम असतानाही 'नाईट क्लब', 'पब', हॉटेलांकडून सुरक्षित अंतराचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे २५, ३१ डिसेंबर आणि एक जानेवारीला '' लावण्याचा निर्णय जवळपास नक्की झाला असल्याचे सांगितले जाते आहे. त्यासाठी मार्गदर्शक नियमावलीही बनवण्यात आली असून आणखी दोन ते तीन दिवस वाट पाहून रविवारी किंवा सोमवारी ही नियमावली जाहीर केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईत सध्या करोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे दुसरी लाट कोणत्याही क्षणी येऊ शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्यानंतरही मुंबईतील पब, हॉटेल, क्लबकडून करोना संदर्भातील मार्गदर्शन तत्वांचे पालन केले जात नाही. पब, हॉटेलमध्ये ५० लोक असावेत व रात्री ११ पर्यंत बंद करणे बंधनकारक असताना या नियमांचे उल्लंघन केले जात आहेत. पालिकेकडे तक्रारी आल्यानंतर गेल्या शनिवारी रात्री १२ वाजता लोअर परळच्या एपीटोम नाइट क्लबमध्ये सुमारे दोन हजार नागरिक तसेच सोमवारी वांद्रे येथील बॉम्बे अड्डा आणि पब व हॉटेलमध्ये २७५ जण विनामास्क आढळून आल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात विनामास्क नागरिक एकत्र आल्याने करोनाचा संसर्ग वाढू शकतो. याची गंभीर दखल घेऊन पालिकेने ही बाब राज्य सरकारला याबाबत पत्र पाठवून कळवली आहे. नाताळ, ३१ डिसेंबर आणि एक जानेवारीला पुन्हा असे प्रकार घडू शकतात. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने या तिन्ही दिवशी रात्री ११ ते पहाटे सहा या वेळेत संचारबंदी लावण्याचा विचार सुरू केला आहे. पब, हॉटेलबरोबरच मरीन ड्राइव्ह, गेट वे ऑफ इंडिया, चौपाट्या या सर्वच ठिकाणी निर्बंध घालण्याची शक्यता आहे. यासाठी २० डिसेंबरपर्यंत वाट पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/34hcfjx
No comments:
Post a Comment