म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचे बोलणे हे काँग्रेसने मार्गदर्शन म्हणून स्वीकारले पाहिजे. आम्हीसुद्धा त्यांचे मार्गदर्शन घेतो. मुख्यमंत्री हे तर शिवसेना पक्षप्रमुख आहेत. तेदेखील शरद पवारांचे मार्गदर्शन घेतात, असे सांगत शिवसेना नेते यांनी शनिवारी काँग्रेसला चिंतन करण्याचा सल्ला दिला. शरद पवार यांनी एका मुलाखतीत बोलताना काँग्रेस नेते, खासदार यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली आहे. काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या बाल व महिला कल्याणमंत्री यांनी ही नाराजी बोलून दाखविताना एक ट्वीट केले आहे. सरकार स्थिर चालवायचे असेल तर आमच्या नेत्यावरील टीका टाळा', असा थेट इशाराच त्यांनी मित्र पक्षांना दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमधून कोणी पुढे आले नसताना राऊत मात्र पवारांची बाजू उचलून धरण्यासाठी मैदानात उतरलेले दिसतात. काँग्रेसला राहुल यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र, त्यांच्या नेतृत्वाबाबत भाजपकडून वारंवार सवाल उपस्थित करण्यात आले. असे असले तरीही राहुल थोडेही डगमगले नाहीत वा ते परिश्रमात कुठेही कमी पडत नाहीत. मात्र, राहुल यांना नशीब साथ देत नाही आहे. अशावेळी पवार काही बोलत असतील तर त्यामागे त्यांचा दांडगा अनुभव आहे. ते जेव्हा काही बोलतात तेव्हा त्यांचा अभ्यास असतो. त्यामुळे राहुल यांनीच नाही, तर कुणीही त्यांचे बोलणे हे मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवे, असे राऊत यांनी म्हटले आहे. सगळ्यांनाच पंडित नेहरू, नरेंद्र मोदी वा शरद पवार होता येणार नाही. प्रत्येकाला काही ना काही मर्यादा असतात, तशा राहुल गांधींमध्येही आहेत. त्यांनी त्या स्वीकारायला हव्यात, असेही ते म्हणाले. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. हैदराबादमध्ये काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. निकालाची पर्वा न करता काँग्रेसने झोकून देऊन काम करायला हवे. काम नागरिकांना दिसले की आपोआप पाठिंबा मिळतो. राहुल हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे आणि कामाला लागावे, असे मतही राऊत यांनी व्यक्त केले. दरम्यान, राऊत यांना लीलावती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. दोन दिवस विश्रांती घेऊन पुन्हा कामाला लागेन, असे राऊत यांनी म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3qAAmUe
No comments:
Post a Comment