Breaking

Saturday, December 5, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्पणपत्रिका, भाषणांची 'अक्षरयात्रा' https://ift.tt/3ovfWK6

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई घटनाकार यांच्या ग्रंथातील अर्पणपत्रिका, रमाबाईंना लिहिलेली पत्रे हे साहित्य त्यांच्या मूळ लेखनाचा आढावा घेताना कधीतरी विस्मरणात जाते. मात्र यातून उलगडणारे आंबेडकर आज, ६ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त साहित्यप्रेमींसमोर येणार आहेत. राज्य मराठी विकास संस्था, राज्य सरकारचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आणि व्हिजन व्हॉइस एन अॅक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज, रविवार, ६ डिसेंबर आणि सोमवार, ७ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजता आंबेडकरांच्या साहित्याच्या अभिवाचनाचा '' हा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे. मराठी भाषामंत्री या अक्षरयात्रा महोत्सवाचा आरंभ करणार आहेत. डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथातील अर्पणपत्रिका, सिद्धार्थ महाविद्यालयाच्या स्थापनावेळचे भाषण, ' माझी आत्मकथा' या निवडक लेखांच्या पुस्तकातील 'मी साहित्यिक आहे असे तुम्हाला वाटते काय' यातील उतारा, रमाबाईंना लिहिलेली पत्रे, त्यांच्या प्रबोधनपर भाषणापैकी 'स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून', ' मी नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे', 'माझे आयुष्य तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे', 'कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे' ही भाषणे, आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय विचार, त्यांच्या पत्रांतील वाङ्मयीन सौंदर्यदर्शन, डॉ. आंबेडकरांची भाषा आणि लेखनशैली असा अनेक पदरी वेध या अभिवाचनाच्या निमित्ताने घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संशोधन आणि लेखांची निवड प्रसिद्ध लेखक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे अभ्यासक किशोर मेढे यांनी केलेली आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील यांची आहे. अभिवाचनाच्या या उपक्रमामध्ये विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, लघु, मध्यम उद्योग सचिव आणि विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांचाही समावेश आहे. तसेच दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, मुंबई दूरदर्शनच्या कार्यक्रम अधिकारी उमा दीक्षित, कलाकार श्रीरंग गोडबोले, सयाजी शिंदे, किशोर कदम, सोनाली कुलकर्णी, उपेंद्र लिमये, लीना भागवत, शर्वाणी पिल्ले, मिलिंद शिंदे, दीपक करंजीकर, मधुरा वेलणकर, मेधा मांजरेकर, तन्वी परांजपे, अमायरा चव्हाण यांचाही या अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3owS9tz

No comments:

Post a Comment