Breaking

Saturday, December 19, 2020

राजस्थान: भिवाडीत हॉटेलातील २ महिला कर्मचाऱ्यांवर सामूहिक बलात्कार https://ift.tt/2KE4RYT

अलवर: राजस्थानच्या जिल्ह्यातील भिवाडीच्या फूलबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीची हत्या करण्यासाठी आलेल्या ५ जणांनी हॉटेलमधील दोन महिला कर्मचाऱ्यांवर सामूहिक बलात्कार केला. बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी या महिलांवर अत्याचार केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ हॉटेलवर पोहोचले. त्यांनी आरोपींना अटक केली. अलवर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रात्री एका हॉटेलमधील खोली भाड्याने घेतली. त्याच हॉटेलमधील दोन महिला कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकून महिलांची आरोपींच्या तावडीतून सुटका केली. हत्येसाठी २० लाखांची घेतली होती सुपारी अलवर जिल्ह्यातील पोलिसांनी एका हत्या प्रकरणातील आरोपी नरेश उर्फ नेहरू याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. आरोपींनी द्वारकाधीश सोसायटीचे चेअरमन धर्मेंद्र जाट यांच्या हत्येची सुपारी घेतली होती. त्यासाठी त्यांनी २० लाख रुपये घेतले होते. पोलिसांनी त्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन विदेशी पिस्तुल, एक देशी कट्टा आणि १२ काडतुसे जप्त केली आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37zcPLA

No comments:

Post a Comment