तेल अवीव: इस्रायलमध्येही करोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी घेतली. नेतन्याहू ही करोना लस घेणारे इस्रायलमधील पहिले व्यक्ती आहेत. लसीकरण कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले. याआधी अमेरिका, रशिया, ब्रिटनमध्ये सुरू करण्यात आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी आपण स्वत: ला पहिली लस टोचून घेतली. नेतन्याहू यांच्यासह इस्रायलचे आरोग्य मंत्री युली एडेलस्टीन यांनादेखील करोनाची लस टोचण्यात आली. या दोन नेत्यांनी फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यात आली. पंतप्रधान नेतन्याहू आणि आरोग्य मंत्री युली एडेलस्टीन यांना लस दिल्यानंतर करोना लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. वाचा: लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येण्याचा विश्वास लस घेतल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, इस्रायलमध्ये लवकरच जनजीवन पूर्वपदावर येईल. हा आनंदाचा क्षण असून देशातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुन्हा एकदा पूर्वपदावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायलच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी इस्रायलच्या फ्रंट लाइन वर्कर्सना १० रुग्णालये आणि लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार आहे. त्यानंतर लसीकरण मोहीम सामान्य नागरिकांसाठी राबवण्यात येणार आहे. लसीकरण्याच्या पहिल्या टप्प्यात ६० हून अधिक वयाच्या नागरिकांना प्राथमिकतेच्या आधारावर लस दिली जाणार आहे. वाचा: २७ डिसेंबरपासून नागरिकांना लस देणार इस्रायलच्या इतिहासातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम २७ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. इस्रायल दररोज ६० हजार नागरिकांना करोनाची लस देण्याची तयारी करत आहे. या लसीकरण मोहिमेसाठी फायजरच्या लस इस्रायलमध्ये दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. इस्रायलने फायजरसह ८० लाख डोससाठी करार केला आहे. वाचा: दरम्यान, अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी अमेरिकेने आणखी एका लशीला मंजुरी दिली आहे. अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या लस व संबंधित जैविक उत्पादन सल्लागार समितीने मॉडर्नाने विकसित केलेल्या लशीला मंजुरी दिली आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी हा दुसरा पर्याय असल्याचे समितीने म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Kp5tl4
No comments:
Post a Comment