जींद, हरयाणा : कृषी विरोधी कायद्याच्या विरोधात आज (शुक्रवारी) शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस आहे. पंजाब - हरणायातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना हरयाणातील भाजपच्या सरकारकडून पाठिंबा मिळालेला नसला तरी हरयाणातील नागरिकांकडून मात्र जाहीररित्या मदतीच्या रुपानं पाठिंबा मिळतोय. उपमुख्यमंत्री यांच्या मतदारसंघ असलेल्या उचानास्थित एका पेट्रोल पंप मालकानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ दिल्लीला निघालेल्या आंदोलनकर्त्यांना मोफत डिझेल देण्याची घोषणा केलीय. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, केवळ माझं कर्तव्य निभावतोय, अशी प्रतिक्रियाही महिपाल लोहन यांनी व्यक्त केलीय. वाचा : वाचा : जेव्हापर्यंत दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात करत राहतील तेव्हापर्यंत दिल्लीत आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या सर्व ट्रॅक्टरमध्ये मोफत डिझेल मिळत राहील, अशी घोषणाच महिपाल लोहन यांनी केलीय. निवडणुकीत हरियाणाच्या जिल्ह्यातील उचाना मतदारसंघातील जननायक जनता पक्षाचे नेते () आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना नागरिकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं होतं. आता मात्र नागरिकांकडून जननायक जनता पक्षावर रोष व्यक्त होत आहे. ज्या दिवशी जननायक पक्षानं आपल्या मूळ विचारधारेला मूठमाती देऊन भाजपची साथ दिली होती त्याच दिवशी त्यांचे उलट पाढे सुरू झाल्याची प्रतिक्रिया, नुकत्याच झालेल्या एका नेत्यांच्या एका बैठकीत व्यक्त करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उचानातून बुधवारी खाप पंचायतीही दिल्लीकडे रवाना झाल्यात. सोबत अनेक ग्रामीण आणि सामाजिक संस्थाही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी समोर आल्या आहेत. वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lz704I
No comments:
Post a Comment