म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउन कालावधीत सोशल मीडियावर ''चा अक्षरशः भडिमार झाल्याचे समोर आले आहे. राजकीय नेत्यांवर टीकाटिप्पणी करणाऱ्या सुमारे १४ हजार पोस्ट लॉकडाउन कालावधीत प्रसिद्ध करण्यात आल्या असून, यापैकी सुमारे ७ हजार पोस्ट महाराष्ट्र सायबर विभागाने हटविल्या. विशेष म्हणजे या पोस्टमधून सरकारमधील नेत्यांबरोबरच विरोधी पक्षातील नेत्यांनाही करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या कालावधीत लोकांचे घराबाहेर पडणे कमी असल्याने अधिक वेळ त्यांच्या हातामध्ये मोबाइल होता. इंटरनेट असल्याने सोशल मीडियाचा वापर या कालावधीत मोठा प्रमाणात झाला. या व्यासपीठाचा वापर राजकीय नेत्यांना ट्रोल करण्यासाठी जास्त झाला. यामध्ये अपमानास्पद भाषा, अश्लील संदेश पाठवून राजकीय नेत्यांना लक्ष्य केले जात होते. ट्रोल करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर करणाऱ्यांवर महाराष्ट्र सायबर सेल बारकाईने लक्ष ठेवून होते. १४ हजार पोस्टपैकी सुमारे ७ हजार पोस्ट महाराष्ट्र सायबरच्या अधिकाऱ्यांनी हटविल्या. अशा पोस्ट करणाऱ्यांना महाराष्ट्र सायबर विभागाच्या वतीने वैयक्तिक संदेश पाठविला जातो. या संदेशला प्रतिसाद देत त्यांनी पोस्ट स्वतःहून न हटविल्यास पुढील कारवाई केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावर अपशब्द वापरून करोना काळात सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. यामध्ये खोट्या बातम्यांच्याही वापर करण्यात आला. ७०७ गुन्हे दाखल महाराष्ट्र सायबर विभागाने ७०७ गुन्हे दाखल केले असून, ३२२ जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये ४३७ पोस्टमुळे समाजात तणाव निर्माण झाला होता. तर १३३ पोस्ट या खोट्या बातम्यांच्या होत्या. ज्यांना सांगूनही पोस्ट हटविल्या नाहीत अशा सुमारे ४०० जणांना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणीही राजकीय नेतेमंडळींना ट्रोल करताना आक्षेपार्ह, अश्लील भाषेचा वापर केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र सायबर विभागाने दिला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39NUqMy
No comments:
Post a Comment