Breaking

Thursday, December 3, 2020

'नागपूर पदवीधर'मध्ये भाजपची दमछाक, निकालासाठी थांबावे लागणार https://ift.tt/33FKqBa

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ६० हजार ७४७ चा कोटा पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार यांना ४ हजार मतांची गरज आहे. आतापर्यंत ११ उमेदवारांच्या मतपत्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी उशीर लागणार असून दुपारपर्यंत ही प्रक्रिया चालू शकते किंवा त्यापेक्षाही अधिक काळ लागू शकतो असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (MLC Election Results 2020) वाचा: कॉंग्रेसचे अभिजित वंजारी पाचव्या फेरीनंतर १४ हजार ४०७ मतांनी आघाडीवर आहे. मात्र कोटा पूर्ण न झाल्याने सर्वात कमी मत मिळविणाऱ्या उमेदवाराला बाद करून त्याच्या मतपत्रिकेतील दुसऱ्या पसंतीची मते मोजली जात आहे. आतापर्यंत ११ उमेदवारांची मते मोजल्यानंतर वंजारी यांची मते ५६ हजार १५५ झाली आहेत. संदीप जोशी यांच्या पारड्यात ४१ हजार ६२२ मते पडली. वंजारी १४ हजार ५३३ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळं ही जागा भाजपकडून निसटल्याचं चित्र आहे. ...तर जोशींच्या मतांचीही मोजणी १९ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांची मते मोजूनही कोटा पूर्ण झाला नाही तर संदीप जोशी यांना प्राप्त मतांचीही पुन्हा मोजणी करून दुसऱ्या क्रमांकाची मते कुणाला दिली हे पाहिले जाईल. सर्व मते मोजूनही कुणीच कोटा पूर्ण केला नाही तर सर्वाधिक मते मिळविणाऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाईल. मात्र याआधीच कोटा पूर्ण झाला तर मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2JCyXf5

No comments:

Post a Comment