Breaking

Thursday, December 3, 2020

'पुणे पदवीधर'मध्ये महाआघाडीचाच डंका; भाजपला धक्का https://ift.tt/36Eh6gx

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुणे पदवीधर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार यांचा पराभव केला. या मतदारसंघात एकूण ६२ उमेदवार होते. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यातील दोन लाख ४७ हजार ५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विजयासाठी एक लाख १३ हजार पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. लाड यांनी पहिल्या फेरीतच एक लाख २२ हजार १४५ मते घेत विजय मिळविला. वाचा: भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची ७३ हजार ३२१ मते मिळाली. त्यामुळे ४८ हजार ८२४ मतांनी लाड यांनी विजय संपादन केला. या विजयामुळे भाजपला धक्का बसला आहे. अरुण लाड व संग्राम देशमुख यांच्याशिवाय जनता दल सेक्युलरचे माजी आमदार शरद पाटील व मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे या देखील रिंगणात होत्या. मात्र, खरी लढत लाड आणि देशमुख यांच्यात असल्याचं सुरुवातीलाच स्पष्ट झालं. अरुण लाड यांच्या विजयानंतर सांगली आणि कुंडल येथे जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mApSBE

No comments:

Post a Comment