म. टा. प्रतिनिधी, मुंबई 'बाबासाहेबांचे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार २०२३ पर्यंत उभारेल', असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्या खा. यांनी व्यक्त केला. ( on Dr. Babasaheb Ambedkar Statue) खा. सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जागेला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे आणि आ. सुनील शेळके उपस्थित होते. यावेळी त्यांनी कामाच्या प्रगतीबाबत तसेच स्मारकाच्या ठिकाणी असणाऱ्या सुविधांबाबत अभियंत्यांकडून माहिती घेतली. या स्मारकाला दररोज पाच हजार लोक भेट देतील असा अंदाज आहे. त्या तुलनेत येणाऱ्या लोकांना पार्किंग, स्वच्छतागृह या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी संबंधितांना केल्या आहेत. करोना काळात राज्यातील सर्वच कामांना थोडी खीळ बसली होती. मात्र आता काम वेगाने सुरू असून एप्रिल २०२३पर्यंत बाबासाहेबांच्या स्मारकाचे कामकाज पूर्ण होईल, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. यावेळी माजी आ. विद्या चव्हाण, मुख्य प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई विभागीय युवती अध्यक्षा अदिती नलावडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले, अल्पसंख्याक सेलचे मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार आणि दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर उपस्थित होते. ६ डिसेंबरला पोस्टकार्ड पाठवा स्मारकाच्या कामाची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने चैत्यभूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी किंवा शिवाजी पार्कला गर्दी न करता त्याऐवजी पोस्टकार्डवर आपला संदेश लिहून चैत्यभूमीच्या पत्त्यावर पाठवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/36IueRV
No comments:
Post a Comment