म. टा. प्रतिनिधी, पुणे आणि या दोन वायुरूपी सध्या सुरू असून, या दोन ग्रहांमधील अंतर चारशे वर्षांत सर्वांत कमी झाल्याचे दृश्य आकाशप्रेमींना सोमवारी पाहायला मिळेल. सोमवारी या दोन ग्रहांमधील अंतर फक्त ०.१ अंश (पौर्णिमेच्या चंद्राच्या व्यासापेक्षा पाच पटींनी कमी) इतके होणार असून, साध्या डोळ्यांनी पाहताना हे दोन ग्रह एकच असल्याचे जाणवेल. याआधी गुरू आणि शनी इतक्या जवळ १६२३ मध्ये आले होते. यानंतर असा योग १५ मार्च २०८० ला येणार असल्यामुळे अनेकांच्या आयुष्यात हे दोन ग्रह इतक्या जवळ आलेले पाहण्याची २१ डिसेंबरची एकमेव संधी आहे. सूर्यास्तानंतर गुरू आणि शनीची जोडी सध्या नैऋत्य क्षितिजाजवळ सुमारे तासभर दिसत आहे. गुरुची मॅग्निट्यूड उणे १.५३ असून, शनी ०.८३ इतक्या मॅग्निट्यूडमध्ये दिसत आहे. पुण्यातून पाहताना सोमवारी संध्याकाळी साडेसहाला गुरू-शनीची जोडी दक्षिण-पश्चिम क्षितीजापासून २२ अंशांवर असेल. आठ वाजून सात मिनिटांनी हे दोन्ही ग्रह मावळणार असून, त्या आधी साडेसातपर्यंत या दोन ग्रहांचे दर्शन घेता येईल. ही दुर्मीळ घटना स्पष्टपणे पाहण्यासाठी टेलिस्कोपची आवश्यकता असेल. ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या वतीने २१ आणि २२ तारखेला केसरीवाडा येथे टेलिस्कोप आणि स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली असून, मर्यादित आकाशप्रेमींना पूर्वनोंदणी करून गुरू-शनीची युती पाहता येईल. संस्थेच्या वतीने पुसाणे या गावी सोमवारी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत गुरू-शनी युती दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. 'खगोल विश्व'च्या फेसबुक पेजवर मोठ्या टेलिस्कोपच्या साह्याने ही युती लाइव्हही दाखवण्यात येणार आहे. दुर्मीळ घटना कशी पाहावी? सोमवारी गुरू आणि शनीमधील अंतर फक्त ०.१ अंश राहणार असल्यामुळे नुसत्या डोळ्यांनी पाहताना हे दोन ग्रह एकच आहेत, असे भासेल. छोट्या दुर्बिणीतून किंवा झूम असलेल्या कॅमेऱ्याने पाहिल्यास या दोन ग्रहांची जोडी दिसू शकेल. मोठ्या टेलिस्कोपमधून पाहताना एकाच दृश्यात गुरू, शनी आणि त्यांचे चंद्रही पाहता येतील. मोबाइलमध्ये ही दुर्मीळ घटना टिपण्यासाठी मोबाइल स्टँडवर लावून 'नाइट मोड'वर छायाचित्र घ्यावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mBsEG5
No comments:
Post a Comment