मुंबईः 'पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी लोकांना करोनाशी लढण्याची प्रेरणा देत आहेत. पण स्वतःवर येते तेव्हा मैदानातून पळ काढत आहेत. करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळं संसदेचं रद्द झाले, ही थाप आहे,' असा घणाघाती आरोप शिवसेनेनं केला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी आधिवेशन रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीवरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या नेत्यांना शिवसेनेनं धारेवर धरलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. करोना काळात अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक पार पडली, ट्रम्प यांच्या जागी बायडन आले. कोविडने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशाची निवडणूक थांबली नाही. आपण संसदेचं चार हिवाळी अधिवेशन होऊ देत नाही. अमेरिकेनं निवडणूक घेतली व लोकशाही मार्गानं सत्तांतर घडवले. ही महासत्तेची लोकशाही आम्ही लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरालाच टाळे लावले, अशी बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे. करोनामुळं जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळं संसदेचं हिवाळी अधिवेशन घेऊ नये असे परस्पर ठरवले आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की, हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याबाबत सर्व पक्षांसोबत चर्चा झाली. ही चर्चा कधी, कुठे आणि कोणत्या व्यासपीठावर झाली? त्या चर्चेत कोण कोण सहभागी झाले होते? संसदेचं अधिवेशन होऊ नये प्रस्तावावर किती रबरी शिक्के उमटले? त्याचा खुलासा झाला असता तर संसदीय लोकशाहीच्या मारेकऱ्यांची नावे जगाला कळली असती, अशी टीका यावेळी त्यांनी केली. करोनाच्या परिस्थितीत बिहारच्या निवडणूका पार पडला. त्यात स्वतः पंतप्रधान मोदी यांनी हजारोंच्या सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी पाच टप्प्यांत लॉकडाऊन संपवला, महाराष्ट्रातील भाजपने तर हे उघडा आणि ते उघडा यासाठी सतत आंदोलनं केली. मंदिरे उघडण्यासाठी भाजपवाले अनेकदा रस्त्यावर उतरले, पण त्यांना लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर उघडू नये, असे वाटणे हे एक प्रकारचे ढोंग म्हणावे लागेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WkQQlp
No comments:
Post a Comment