Breaking

Wednesday, December 16, 2020

बजरंग दलाच्या कंटेन्टवर बंदीची गरज नाही : फेसबुक इंडिया https://ift.tt/3mxYIe4

नवी दिल्ली : 'विश्व हिंदू परिषदे'ची युवा शाखा असलेल्या 'बजरंग दला'वर कोणतीही कारवाई करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'फेसबुक'नं नकार दिलाय. फेसबुक इंडियाचे प्रमुख यांनी बुधवारी संसदेच्या एका समितीला माहिती दिलीय. सोशल मीडिया कंपनी किंवा तथ्यशोधक गटाला आक्षेपार्ह असा कोणताही मजकूर किंवा सामग्री आढळळी नाही, ज्यामुळे बजरंग दलावर बंदी घालण्याची गरज आहे, असं फेसबुक इंडियाकडून सांगण्यात आलंय. या अगोदर फेसबुककडून 'बजरंग दला'चा समावेश 'धोकादायक संघटनेत' करण्यासाठी नकार देण्यात आला होता. अजित मोहन बुधवारी काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील माहिती तंत्रज्ञान संबंधी संसदेच्या स्थायी समितीसमोर हजर झाले. यावेळी, त्यांच्यासोबत फेसबुकचे सार्वजनिक धोरण संचालक शिवनाथ ठुकराल हेदेखील उपस्थित होते. समितीनं त्यांना नागरिक डाटा सुरक्षेच्या मुद्द्यावर पाचारण केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशी थरुर यांच्यासोबत काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम उपस्थित होते. त्यांनी अजित मोहन यांच्याकडे बजरंग दलावर बंदीशी निगडीत वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टबद्दल प्रश्न केले. या प्रश्नांची उत्तरं देताना अजित मोहन यांनी समितीच्या सदस्यांना बजरंग दलाकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात येणाऱ्या कंटेन्टबद्दल आपलं मत मांडलं. यावेळी, 'बजरंग दलावर कारवाई करावी, असा कोणताही कंटेन्ट सोशल मीडिया कंपनी आणि तथ्यशोधक टीमला आढळला नसल्याचं' त्यांनी म्हटलंय. वाचा : वाचा : दिल्लीतील चर्चवर हल्ला 'वॉल स्ट्रीट जर्नल' या अमेरिकन वृत्तपत्राच्या एका रिपोर्टमध्ये, बजरंग दलावरच्या कारवाईबाबत उल्लेख करण्यात आलाय. यामध्ये, अंतर्गत मूल्यांकनानंतरही फेसबुकनं आर्थिक कारणांमुळे तसंच आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणांनी बजरंग दलावर कारवाई केली नसल्याचं म्हटलं गेलंय. जूनमध्ये दिल्लीबाहेर चर्चवर हल्ला झाल्यानंतर, बजरंग दलाला 'धोकादायक संघटना' म्हणून घोषित करण्याची मागणी पुढे आली होती. यावेळी, हिंदू मंदिरांच्या जागेवर चर्चची स्थापना करण्यात आल्याचा दावा करत हल्लेखोरांनी पोस्टर्स लावले होते. बजरंग दलाच्या सदस्यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. बजरंग दलाबद्दल वॉल स्ट्रीट जर्नलचा रिपोर्ट चुकीचा असेल तर 'फेसबुक'कडून हा रिपोर्ट खोटा असल्याचं का जाहीर करण्यात आलं नाही, असा प्रश्न भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी विचारला. वाचा : वाचा : उल्लेखनीय म्हणजे, कट्टर हिंदुत्वाच्या मुद्याला खतपाणी घालणाऱ्या , बजरंग दल या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत संघटना आहेत. १९८४ साली उत्तर प्रदेशात स्थापना झालेल्या बजरंग दलाच्या शाखा इतर राज्यांतही पसरलेल्या आहेत. वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nsml92

No comments:

Post a Comment