म. टा. विशेष प्रतिनिधी, सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी अपायकारक असलेले तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, पानमसाला व सुंगधी सुपारी यांच्या विक्रीवर प्रतिबंध असतानाही आणि फ्लिपकार्ट या कंपन्या ई-कॉमर्सच्या माध्यमातून या पदार्थांची सर्रास विक्री करत आहेत. या प्रकारांना चाप लावण्यासाठी ाने या ई-कॉमर्स कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून अन्य ई-कॉमर्स कंपन्यांनाही या कारवाईद्वारे थेट इशारा देण्यात आला आहे. राज्यात सन २०१२पासून जनहितार्थ गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू व सुंगधी सुपारी यांची विक्री, उत्पादन व वितरणास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र अॅमेझॉन व फ्लिपकार्ट यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने २००६च्या कलम ५९ अंतर्गत फौजदारी कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे प्रतिबंधित अन्नपदार्थांची जाहिरात केल्याप्रकरणी कलम ५३ अंतर्गत दंडात्मक कारवाईही सुरू केली आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६नुसार कलम ५९ अंतर्गत सहा वर्षांची शिक्षा व पाच लाख रुपये दंड, तर कलम ५३ अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. लॉकडाउन काळामध्ये मार्च महिन्यापासून करोना संसर्गाची शक्यता टाळण्यासाठी ऑनलाइन वस्तू मागवण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढता आहे. विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये ग्राहकांची मानसिकता तसेच क्रयशक्तीही बदलत असते, त्याचा अभ्यास करून अन्न व औषध प्रशासनाने बाजारातील बदलांचा वेध घेतला. त्यावेळी काही ई-कॉमर्स कंपन्या या सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिरातीही देत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्या दरम्यान प्रशासनाने स्थापन केलेल्या भ्रामक जाहिरातीविरोधी शाखेला पानमसाला व सुगंधी सुपारीची राज्यात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. विशेष शाखेतील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह मुख्यालयातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी या माहितीची शहानिशा करण्यासाठी तसेच या कृतीचा सबळ पुरावा मिळवण्यासाठी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून पानमसाला व सुंगधी सुपारी हे प्रतिबंधित अन्नपदार्थ १७ ते २८ डिसेंबर या कालावधीमध्ये मागवले. हे पदार्थ वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून या दोन ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून २० ते २९ डिसेंबर या कालावधीमध्ये मुंबई व ठाणे येथील पत्त्यांवर आले. यामध्ये विविध कंपन्यांचा रजनीगंधा पानमसाला, बबलू गोल्ड सुंगधी सुपारी, हॅपी लाइफ पानमसाला, अशोका मसाला सुपारी, केसरी तुकडा, बिईंग मारवारी सुंगधी सुपारी, रसिली सुंगधी सुपारी, फ्रेशो काटर्झ सुंगधी सुपारी हे प्रतिबंधित अन्नपदार्थ मध्यप्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, गुजरात या राज्यांतून आणण्यात आले. वरील पैकी काही विक्रेत्यांकडे अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत परवाना नसल्याचेही प्राथमिक तपासणीमध्ये आढळून आले आहे. जनहिताला प्राधान्य या उत्पादनांवर सरकारने बंदी आणली आहे. तरीही या ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून गैरप्रकार सुरू आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत बाजारातील व्यवसायाच्या बदलणाऱ्या स्वरूपावर अन्न व औषध प्रशासनाने लक्ष ठेवले होते. अशा गैरप्रकारांना तातडीने प्रतिबंध करण्यात येईल. सर्वसामान्यांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. - अभिमन्यू काळे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2X0QC2U
No comments:
Post a Comment