Breaking

Wednesday, December 30, 2020

नव्या करोनाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले 'हे' आवाहन https://ift.tt/3ofgp3L

म. टा. प्रतिनिधी, मुंबई 'राज्यात नव्या करोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही. तथापि, आपल्याला गाफील राहून चालणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी सर्व खबरदारी घेत आहे. पण, राज्यातील प्रत्येक नागरिकानेही काळजी घेतली पाहिजे,' असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी बुधवारी केले. 'राज्यात पुन्हा लॉकडाउन जाहीर करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही. तसेच, मुंबईत सर्वसामान्यांना रेल्वेची उपनगरी उपलब्ध करून देण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नजीकच्या काळात घेतील,' असेही संकेत टोपे यांनी दिले आहेत. देशात नव्या करोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण सापडले आहेत; पण महाराष्ट्रात अजूनतरी नव्या करोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलेला नाही. आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत,' असे टोपे यांनी स्पष्ट केले. ब्रिटनमधून भारतात आलेल्या प्रत्येक प्रवाशाचा स्वॅब घेऊन त्यांचे विलगीकरण केले जात आहे. आत्तापर्यंत ४३ जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. नव्या करोनाच्या संसर्गावरून महाराष्ट्र सरकार दक्ष झाले आहे. राज्य सरकार अत्यंत गंभीरपणे या प्रकरणात लक्ष घालत असून, निष्काळजीपणा केला जात नाही, असे ते म्हणाले. ब्रिटनमधून आलेले काही प्रवासी सापडत नाहीत हा गंभीर विषय आहे. पोलिसांना या प्रवाशांना शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या प्रवाशांचा शोध सुरू आहे. या प्रवाशांनीही स्वत:हून आरोग्य यंत्रणेसमोर येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rGmcRI

No comments:

Post a Comment