बंगळुरू : कर्नाटक एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ आढळल्यानंतर राज्याला मोठा धक्का बसलाय. धर्मेगौडा यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याचं प्राथमिकदृष्टया दिसतंय. धर्मेगौडा यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाईड नोटही आढळली आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेत विरोधकांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे धर्मेगौडा चर्चेत आले होते. धर्मेगौडा यांचा मृतदेह चिकमंगळुरूमध्ये कादूरनजिक एका रेल्वे ट्रॅकजवळ आढळलं. मध्यरात्री जवळपास २.०० वाजल्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केलीय. 'राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती आणि जेडीएस नेते यांच्या आत्महत्येच बातमी धक्कादायक आहे. ते खूपच शांत आणि सभ्य नेता होते. यामुळे राज्याला मोठं नुकसानं झालंय' अशी प्रतिक्रिया जेडीएस नेते एच डी देवेगौडा यांनी व्यक्त केलीय. विधान परिषदेत विरोधकांनी खुर्चीतून खाली खेचलं काही दिवसांपूर्वी कर्नाटक विधान परिषदेत नेत्यांनी धर्मेगौडा यांच्यासोबत धक्काबुक्की केली होती. इतकंच नाही तर त्यांना खुर्चीतून खालीही खेचलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3hqs5Oh
No comments:
Post a Comment