Breaking

Monday, December 28, 2020

नवीन वर्षात सुट्ट्यांची चंगळ! 'या' तारखा लॉक करून ठेवा https://ift.tt/34QjzTO

म. टा. वृत्तसेवा, ठाणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बहुतेकांना नव्या वर्षात कधी काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. आगामी २०२१चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षभरात आकाशात एकूण चार चंद्र आणि सूर्यग्रहणे होणार असली तरी त्यापैकी फक्त एक खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसेल, अशी माहिती पंचांगकर्ते यांनी दिली. विशेष म्हणजे नवीन वर्षात सुट्ट्यांची चंगळ आहे. पुढील वर्षी एकूण २५ सार्वजनिक सुट्ट्यांपैकी २५ एप्रिल-श्री महावीरजयंती आणि १५ ॲागस्ट-स्वातंत्र्यदिन या दोनच सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. त्यामुळे नोकरदारांना २३ सुट्ट्या मिळणार आहेत. एप्रिल महिन्यात आलेल्या ५ सुट्ट्यांपैकी १३ एप्रिल-गुढीपाडवा आणि १४ एप्रिल-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या दोन सुट्ट्या जोडून आल्या आहेत. बुधवारी, २६ मे रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण फक्त ईशान्य भारतातील जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, कटक, कोलकाता, आसाम, मिझोरम, मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश येथून दिसणार आहे. त्यानंतर पुढील वर्षात गुरुवारी, १० जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण, शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आणि शनिवार ४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. परंतु ही तीनही ग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला 'सूपरमून' म्हणतात. अशावेळी चंद्र १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक तेजस्वी दिसतो. सन मध्ये मंगळवारी, २७ एप्रिल आणि बुधवारी, २६ मे रोजी सुपरमून दिसणार आहे. चंद्रबिंब जेव्हा एखाद्या ग्रह किंवा ताऱ्याला झाकून टाकते तेव्हा त्याला 'पिधान युती' म्हणतात. पुढील वर्षी शनिवारी, १७ एप्रिल रोजी चंद्र-मंगळ पिधान युती दिसणार आहे. मंगळ चंद्राआड जाताना दिसणार नाही, परंतु सायंकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी मंगळ ग्रह चंद्रबिंबामागून बाहेर पडताना दिसणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही दुर्मिळ घटना पर्वणी ठरणार आहे. उल्का वर्षावाचे आठ योग पुढील वर्षात ४ जानेवारी, २२ एप्रिल, ५ मे, २० जून, २८ जुलै, १२ ॲागस्ट, २२ ॲाक्टोबर, १७ नोव्हेंबर आणि १३ डिसेंबर रोजी रात्री आकाशातून उल्कावर्षाव होताना पाहायला मिळणार आहे. सन २०२१ मध्ये १९ जानेवारी ते ११ फेब्रुवारी गुरू ग्रह आणि २१ फेब्रुवारी ते १६ एप्रिल शुक्र ग्रह सूर्य तेजात लुप्त झाल्यामुळे दिसणार नाहीत. आठ महिने , तीन अंगारकी पुढील वर्षात मार्च, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे चार महिने वगळता इतर आठ महिन्यांत भरपूर विवाह मुहूर्त आहेत. गणेशभक्तांसाठी २ मार्च, २७ जुलै आणि २३ नोव्हेंबर अशा तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी आहेत. सुवर्ण खरेदी करणारांसाठी २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी, ३० सप्टेंबर, २८ ॲाक्टोबर आणि २५ नोव्हेंबर असे पाच गुरुपुष्य योग आले असल्याची माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38H6qgL

No comments:

Post a Comment