म. टा. वृत्तसेवा, यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला आहे. श्वास अडकल्याने त्यांचा झाला असल्याचे समोर आले आहे. पोलिस तपासात घातपाताचा प्रथमदर्शनी पुरावा दिसलेला नाही. अद्याप सायबर व फॉरेन्सिक अहवाल आलेले नाहीत. या अहवालानंतरच घटनेविषयी अधिक स्पष्टता येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आनंदवनातील आपल्या निवासस्थानी तीस नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. या धक्कादायक घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे. तपासाबाबत अधीक्षक साळवे म्हणाले, डॉ. शीतल या मागील दीड वर्षांपासून नागपूर येथे मानसोपचार तज्ज्ञांकडे औषधोपचार घेत होत्या. जून महिन्यात मानसिक तणावामुळे झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. २१ नोव्हेंबर रोजी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या फार्मसिस्टला प्राणघातक इंजेक्शनच्या उपलब्धतेविषयी विचारणा केली होती. घटनास्थळावरून सदर तीन इंजेक्शन, निउक्युरॉन इंजेक्शन फुटलेल्या अवस्थेत व वापरलेले सीरिंज आढळले होते. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. तपासादरम्यान आजवर २६ साक्षीदारांचे बयाण नोंदविण्यात आल्याचे साळवे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे व वरोऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे उपस्थित होते. प्रयोगशाळांच्या अहवालांची प्रतीक्षा घटनास्थळावरून जप्त मुद्देमाल, व्हिसेरा तपासणीसाठी चंद्रपूर व नागपूरच्या प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात आला आहे. जप्त तीन मोबाइल, एक लॅपटॉप, टॅब्लेट हे परीक्षणासाठी मुंबईच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबईला पाठविण्यात आले आहेत. या दोन्ही प्रयोगशाळांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ते मिळताच योग्य तो तपास करण्यात येईल, असेही साळवे यांनी स्पष्ट केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pOV9SP
No comments:
Post a Comment