हैदराबाद : देशात चर्चेचा विषय ठरलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय. सुरुवातीला हाती आलेल्या कलानुसार भाजपनं या भागात मुसंडी मारल्याचं दिसून येतंय. ओवैसी यांचा गढ समजल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये २८ जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती १० जागांवर आघाडीवर आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाचे खासदार हे हैदराबादमधून भरघोस मतांनी निवडून आलेत. (अपडेट बातमी पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करा) LIVE अपडेट - सकाळी ९.०० वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार, भाजप २८ जागांवर आघाडीवर आहे. तर तेलंगणा राष्ट्र समिती १० जागांवर आघाडीवर आहे. हैदराबादच्या या निवडणुकीत तब्बल ११२२ उमेदवारांचं भवितव्य ठरत आहे. २०१६ च्या निवडणुकीत भाजपच्या युतीला इथे केवळ पाच जागा मिळवता आल्या होत्या. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला ९९ तर ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाला ४४ जागांपैंकी केवल पाच जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला केवळ दोन जागा मिळवता आल्या होत्या. हैदराबाद महानगरपालिकेत एकूण १५० मतदारसंघ आहेत. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) १५० मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. तर भाजप (BJP) १४९, काँग्रेस (Congress) १४६, तेलुगु देसम पार्टी (TDP) १०६, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ५१, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) १७, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM) १२ तर इतर पक्ष ७६ जागांवर निवडणूक लढवत आहेत. १ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात ४६.५५ टक्के मतदान झालं होतं. संबंधित बातम्या : वाचा : वाचा : वाचा : वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33KoMff
No comments:
Post a Comment