Breaking

Friday, January 1, 2021

Covid-19 Vaccine: कशी मिळणार लस? विमानतळ ते केंद्रापर्यतची 'अशी' आहे तयारी! https://ift.tt/3n16zRq

नवी दिल्ली: नव्या वर्षाच्या आगमनासोबतच लोकांमध्ये करोनापासून मुक्तीची आशा देखील जागी झाली आहे. या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीरम इन्स्टीट्यूटच्या (Serum Institute)लशीला आपत्कालीन वापरासाठी तज्ज्ञ समितीकडून हिरवा झेंडा मिळाला, तर दुसरीकडे आज शनिवारी देशातील सर्व राज्यांमधील दोन-दोन शहरांमध्ये लशीचे () घेण्यात येत आहे. यामुळे जगातील सर्वात मोठ्या करोना अभियानाची (Corona Vaccination Campaign) आशा देखील पल्लवीत झाली आहे. जाणून घेऊया लशीचा आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आणि लस कशी विमानतळापर्यंत पोहोचेल आणि तेथून ती आपल्यापर्यंत नेमकी कशी पोहोचेल. (india's ) करोना लशीचा प्रवास करोनाची लस विमानतळावर विशेष कार्गो विमानांद्वारे आणली जाईल. तेथून लस विशेष रेफ्रिजरेटेड व्हॅन्समधून चार मोठे स्टोरेज केंद्रांवर आणली जाईल. करनाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकता येथे ही केंद्रे आहेत. दिल्लीचे एक उदाहरण घेऊ या. तशीच प्रक्रिया उर्वरित केंद्रावर होणार आहे. करनाल येथून विशेष रेफ्रिजरेटेड व्हॅन्सद्वारे लस दिल्लीच्या स्टोरेज केंद्रावर पोहोचविली जाईल. ही लस कार्गो विमानाने थेट दिल्लीला देखील आणली जाऊ शकते. दिल्लीत ठिकठिकाणी एकूण ६२९ केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांवर लस पोहोचविण्यासाठी खासगी रेफ्रिजरेटेड व्हॅन्सची सेवा घेतली जाणार आहे. लस कोल्ड स्टोरेज केंद्रापर्यंत पोहोचल्यानंतर ती लसीकरण बूथपर्यंत पोहोचविली जाईल. दिल्लीत सरकारी आणि खासगी रुग्णालये, मोहल्ला क्लिनिक आणि इतर ठिकाणी एकूण १००० लसीकरण बूथ तयार करण्यात आले आहेत. लसीकरण बूथ कसे असतील प्रत्येक लसीकरण बूथवर ३ कॅमेरे किंवा चिन्हित क्षेत्रं असतील. पहिले वेटिंग रुम असेल. येथे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकाच्या ओळखपत्रांची तपासणी केली जाईल. लस घेण्यासाठी सर्वप्रथम येथेच पोहोचावे लागणार आहे. पडताळणीनंतर संबंधित व्यक्तीला लसीकरण खोलीत पाठवले जाईल. तेथे त्या व्यक्तीला लस दिली जाईल. त्यानंतर संबंधित व्यक्तीला ऑब्झर्व्हेशन रुममध्ये पाठवले जाईल. तेथे अर्धा तास त्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जाईल. लसीचे साइडइफेक्ट होत आहेत का हे यावेळी पाहिले जाईल. लसीकरण खोलीत एकावेळी एकाच व्यक्तीला प्रवेश लसीकरण खोलीमध्ये एकावेळी फक्त एकाच व्यक्तीला पाठवले जाईल. खोलीत ५ लसीकरण अधिकारी असतील. त्यांव्यतिरिक्त एक सुपरवायझर असेल. तो संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून असेल. लसीकरणासाठी व्यक्तीला एसएमएसद्वारे मिळणार माहिती लस देण्यासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तीला लसीकरणाबाबत अगोदरच माहिती देण्यात येईल. त्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वीत एसएमएसद्वारे ही माहिती दिली जाईल असे सांगितले जात आहे. अमूक दिवशी अमूक वाजता आपण अमूक पत्त्यावर लसीकरणासाठी पोहोचावे अशी सूचना त्या व्यक्तीला देण्यात येईल. लसीकरण अभियानासाठी Co-WIN नावाचे अॅप तयार करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांमध्ये या अॅपवर सेल्फ रजिस्ट्रेशनची सुविधा सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांना टोचणार लस पहिल्या टप्प्यात ५१ लाख लोकांना करोनाची लस दिली जाणार आहे. यांमध्ये ३ लाख आरोग्य कर्मचारी, ६ लाख फ्रंटलाइन वर्कर्स आणि ४२ लाख ५० हून अधिक वयाचे लोक किंवा ज्यांना गंभीर आजार असेल अशांचा समावेश आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ob9Xuy

No comments:

Post a Comment