Breaking

Friday, January 1, 2021

Explained: देशात आजपासून सुूरू होणार करोना लशीचे ड्राय रन, जाणून घ्या प्रक्रिया!! https://ift.tt/3pL0ISb

नवी दिल्ली: देशभरात आजपासून लशीचे () सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. हे ड्राय रन देशातील प्रत्येक राज्यात दोन-दोन शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहे. याच आधारावर वास्तविक अभियान () चालवले जाणार आहे. या ड्रायरनच्या वेळी कोणत्याही लशीचा वापर केला जाणार नाही. सरकारने तयारी केलेली लसीकरणाची योजना किती मैत्रीपूर्ण आहे हे या ड्रायरनद्वारे तपासले जाणार आहे. या व्यतिरिक्त सरकार Co-WIN अॅपद्वारे रियल-टाइम मॉनिटरिंगची देखील तपासणी करेल. आरोग्य मंत्रालयाचे पथक ठेवणार लक्ष आतापर्यंत देशातील पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेशात अशा प्रकारचे ड्रायरन घेण्यात आले होते. या चार राज्यांमध्ये चांगला परिणाम दिसला. यानंतर सरकारने संपूर्ण देशा ड्रायरन लागू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आरोग्य मंत्रालयाने एक विशेष पथक स्थापन केले आहे. हे पथक ड्रायरनच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे. तालीम करत असताना याची होणार तपासणी ड्रायरन अंतर्गत कोविड-१९ लशीचे कोल्ड स्टोरेज, वाहतुकीची व्यवस्था, लसीकरणस्थळावर गर्दीचे व्यवस्थापन, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखणे अशा गोष्टींची विशेष काळजी घेतली जाणार आहे. लशीचे ड्रायरन कशासाठी? अंतिम लसीकरण अभियान सुरू करण्यापूर्वी त्यातील कमतरता वेळीच लक्षात याव्यात यासाठी ड्रायरन घेतले जाते. या व्यतिरिक्त अभियानात सहभागी असलेल्या कार्यक्रम व्यवस्थापकांना प्रत्यक्ष अनुभव देखील मिळण्यास मदत होते. खरे तर तालिमीमुळे कोविड-१९ लस उपलब्ध करणे, लसीकरणाची तपास प्रक्रिया, नियोजन, अंमलबजावणी, रिपोर्टिंगमध्ये समन्वय, आव्हाने ओळखणे, वास्तविक अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन, सुधारणांची आवश्यकता आहे की नाही अशा महत्वाच्या गोष्टींची तपासणी होणार आहे. काय असते ड्रायरन? ड्रायरनचा अर्थ संपूर्ण लसीकरण अभियान प्रक्रियेचे मॉकड्रिल करणे. अर्थात प्रत्यक्ष लसीकरणाच्यावेळी जी प्रक्रिया होते ती सर्व करून पाहणे. याचाच अर्थ डमी लस कोल्ड स्टोरेजमधून काढून लसीकरण केंद्रावर पोहचविली जाईल. साइट्सवर क्राउड मॅनेजमेंटबाबत देखील पाहणी केली जाईल. लशीच्या रियल टाइम मॉनिटरिंगदेखील पाहिले जाईल. एकूण खरी लस टोचण्याचे काम वगळता सर्व काही करून पाहिले जाणार आहे. क्लिक करा आणि वाचा- ड्रायरन नंतर काय होणार? ड्रायरन दोन दिवस चालेल. त्यानंतर एक रिपोर्ट तयार केला जाईल. राज्य स्तरावर तयार करण्यात आलेले टास्क फोर्स त्याचा आढावा घेईल. यानंतर याचा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पाठवला जाईल. केंद्रीय स्तरावर चार राज्यांमध्ये चालवण्यात आलेल्या ड्रायरनचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर जर योजनेत बदल करण्याची आवश्यकता असल्यास तो केला जाईल. सर्वकाही व्यवस्थित असेल तर योजनेनुसार जानेवारीतच लसीकरण मोहीम सुरू केली जाईल. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2LgV3UE

No comments:

Post a Comment