म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी मुंबई पालिकेकडून जय्यत तयारी सुरू आहे. पालिकेच्या नियोजनानुसार लसीकरण मोहीम पाच टप्प्यांत पूर्ण होणार आहे. त्यासाठी गेल्या १४ दिवसांत ७६२ मुख्य प्रशिक्षकांचे प्रशिक्षणदेखील पार पडले आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी लसीकरणासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर मुंबई पालिकेनेही त्याबाबत अंतिम तयारी चालवली आहे. पालिकेने पाच टप्प्यांत लसीकरण करण्याचे ठरविले असून त्यातील पहिल्या टप्प्यात सव्वा लाख डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. लसीकरण यशस्वी होण्यासाठी पालिकेने गेल्या १४ दिवसांत ७६२ मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले. तर, या प्रशिक्षकांनी आतापर्यंत २,५०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. पालिकेने त्यासाठी १८ डिसेंबरपासून लसीकरण प्रशिक्षण हाती घेत सर्व विभागात त्याचे शिक्षण पुरविण्यात आले. त्यात शुक्रवार हा प्रशिक्षणाचा अंतिम दिवस होता. पालिकेच्या प्रशिक्षण कालावधीत पहिल्या टप्प्यात लसीकरण नेमके कशातऱ्हेने करावे, कशाप्रकारे काळजी घेण्यात यावी आदींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने विकसित केलेल्या ''मध्ये संबंधित व्यक्तींची माहिती कशाप्रकारे भरावी, यासोबतच अॅपचा नेमका वापर कसा करावा, यावरही भर देण्यात आला. तर, मुंबईतील ८ रुग्णालयांत लसीकरण केले जाणार असल्याचेही सांगितले जाते. कोल्ड स्टोअरेज १० जानेवारीपर्यंत सज्ज पालिकेचे कांजुरमार्ग येथील कोल्ड स्टोअरेज १० जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या स्टोअरेजमध्ये मुंबईकरांना पुरविण्यात येणाऱ्या लसींचा साठा ठेवला जाणार आहे. या ठिकाणी सुमारे १५ लाख लसींचा साठा ठेवता येऊ शकतो.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3o8NduS
No comments:
Post a Comment