Breaking

Friday, January 1, 2021

रुग्णसंख्या घटतेय; करोना सेंटरचं काय होणार? https://ift.tt/38PugqY

म. टा. विशेष प्रतिनिधी, रुग्णसंख्या घटूनही जानेवारी महिन्यात जंबो कोविड केंद्रे बंद करण्याचा निर्णय लांबण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेत, कोणतेही बंद न करण्याच्या निर्णय घेतला आहे. जंबो कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसंख्या सध्या कमी झाली आहे. मात्र मुंबई महापालिकेने पुढील तीन महिन्यांपर्यंत कोणतेही बंद केले जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या आठवड्यापर्यंत थांबून रुग्णांचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटन आणि मध्यपूर्वेकडील देशांमध्ये कोविड -१९चा नवीन प्रकारचा विषाणू समोर आल्यानंतर ही भूमिका घेण्यात आली आहे. सध्या करोनाशी संबंधित सर्व निर्णय 'प्रतीक्षा करा आणि पाहा' या भूमिकेतून घेतले जात आहेत. भायखळा, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, नेस्को मैदान (गोरेगाव पूर्व), मुलुंड आणि दहिसर या पाच ठिकाणी जंबो कोविड केअर केंद्रे आहेत. महालक्ष्मी केंद्रातील सामान्य वॉर्ड बंद करण्यात आला आहे. मात्र, आयसीयू आणि व्हेंटिलेटर सुविधा कार्यरत आहे. 'सर्व जंबो सुविधा अजूनही कार्यरत आहेत. या छोट्या सुविधांमधील मनुष्यबळ आता मोठ्या सुविधांमध्ये आता रुपांतरीत केले जात आहे. शिवाय, लहान केंद्रे कायमस्वरूपी बंद केले जात नाहीत. कारण, गरज पडल्यास ती पुन्हा सुरू केली जाऊ शकतात,' असे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान मुंबईतील सर्व २४ वॉर्डांमध्ये जवळपास ४५० छोट्या कोविड सुविधा बंद केल्या आहेत. पालिका रुग्णालयाचे संचालक आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, ४५० पैकी सर्व कोविड सेंटर बंद केलेली नाहीत. बहुतांश सुविधा 'स्टँडबाय मोड'वर आहेत. म्हणजेच, त्या बंद असूनही, गरज भासल्यास ४८ तासांच्या आत चालू करता येतील. कोविड केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, आता नव्या विषाणूमुळे तो पुढे ढकलला गेला आहे. मात्र, कोविड सेंटरची गरज आता फक्त ४० टक्के उरली आहे. अनेक ठिकाणच्या खाटा रिक्त आहेत. त्यामुळे, हळुहळू ते कमी केले जातील. नव्या ‌विषाणूमुळे थोडे थांबून यावर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या आठवड्यात निर्णयाची शक्यता 'जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर कोविड केंद्राबाबत निर्णय घेऊ. एकतर ते बंद करू किंवा त्यांची संख्या कमी केली जाऊ शकते. नव्या विषाणूमुळे सध्या हा निर्णय पुढे ढकलला आहे,' असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nd7a2I

No comments:

Post a Comment