Breaking

Friday, January 29, 2021

दिल्ली स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर? दोन जण सीसीटीव्हीत कैद https://ift.tt/2Yvt4UG

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आलीय. याअगोदर, स्फोटासाठी आयईडीचा वापर करण्यात आल्यीच शक्यता प्राथमिक चौकशीनंतर व्यक्त करण्यात आली होती. स्फोटासाठी छोट्या छोट्या बॉल बेअरिंगचाही वापर करण्यात आला. तपास यंत्रणेला घटनास्थळी सॉफ्ट ड्रिंकच्या कॅनचे काही छोटे छोटे तुकडेही मिळालेत. तपास यंत्रणेला स्फोटाच्या फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतिक्षा आहे. फुटेजमध्ये दोन जण आढळले स्फोट झालेल्या भागाजवळच तपास यंत्रणेनं हस्तगत केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित दिसून येत आहेत. त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तपासासाठी ''ची मदत हा दहशतवादी हल्ला असल्याची शंका इस्रायलच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलीय. भारतीय एजन्सीसोबतच इस्रायलची चौकशी यंत्रणा 'मोसाद'देखील या घटनेचा तपास करत आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर नजर दिल्ली स्फोटानंतर तपास यंत्रणा अलर्ट झालीय. राजधानी दिल्लीत पुन्हा एक मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. भारतानं बाहेर जाणाऱ्या पॅसेंजर्सवर नजर ठेवणं सुरू केलंय. स्फोटानंतर इमिग्रेशन आणि विमानतळ अधिकाऱ्यांना अलर्ट करण्यात आलंय. पुढच्या ४७ ते ७८ तास भारतातून बाहेर जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर नजर ठेवली जातेय. वाचा : दहशतवाद फैलावण्याचा उद्देश? इस्रायली दूतावासाजवळच असलेल्या जिंदल हाऊससमोर शुक्रवारी सायंकाळी हा स्फोट घडवून आणण्यात आला. ज्या वेळी हा स्फोट झाला तेव्हा त्या ठिकाणी कोणतीही हालचाल दिसून आली नाही. दाब वाढल्यानं हा बॉम्ब फुटला गेला अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय. या स्फोटात कुणीही जखमी झालेलं नाही. परंतु, या भागात उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा मात्र स्फोटाच्या तीव्रतेमुळे निखळून पडल्या. स्फोटाचा उद्देश नुकसान पोहचवणं नाही तर दहशतवाद पसरवण्याचा असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cpf7je

No comments:

Post a Comment