वृत्तसंस्था, नवी दिल्ली : करोना संकटामुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री आज, एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पाची आर्थिक लस देतील, अशी अपेक्षा समाजातील सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा आणि संरक्षण या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद या वेळी असेल, अशी अटकळ बांधली जात आहे. मोदी सरकारचा यंदाचा नववा असणार आहे. यापूर्वी एक हंगामी अर्थसंकल्प सोडल्यास सात पूर्ण अर्थसंकल्प या सरकारने मांडले होते. हा नववा अर्थसंकल्प , ग्रामीण विकास यावर भर देणारा ठरेल. त्याचप्रमाणे विकास योजनांसाठी वाढीव तरतूद, करदात्याच्या हातात पैसा देणे, विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उपाययोजना करणे यासारख्या गोष्टीही यंदाच्या अर्थसंकल्पाकडून प्राप्त होतील, अशी आशा आहे. सीतारामन यांनी २०१९ मध्ये चामड्याच्या बॅगमधून अर्थसंकल्पाचा दस्तावेज सादर केला होता. त्या वेळी त्याला पारंपरिक 'बही-खात्या'चे स्वरूप देण्यात आले होते. यंदाचा अर्थसंकल्प कुणीही आधी पाहिला नसेल असा असेल, असे त्या सुरुवातीपासूनच म्हणत आहेत. त्यामुळे त्यांनी या वेळेस कागदी छपाईला फाटा देत डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. प्रत्येक खासदाराला हा अर्थसंकल्प सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात दिला जाणार आहे. आव्हाने अनेक चालू आर्थिक वर्षाचा जीडीपी उणे सात ते आठ टक्के असेल असे सर्वच अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे सरकारला अर्थसंकल्पाची आखमी करताना अत्यंत काळजीपूर्वक करावी लागली आहे. मंदीसदृश्य परिस्थितीशी सामना करतानाच करोनाचे संकट आल्यामुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. यातून तिला बाहेर काढून अर्थव्यवस्थेचा गाडा रुळांवर आणण्यासाठी सरकारला महत्त्वाची भूमिका अदा करावी लागणार आहे. करोना लसीकरणातील प्रगती ही काही प्रमाणात आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे, तिचाही फायदा करून घ्यावा लागणार आहे. लॉकडाउनमुळे साथ आटोक्यात आली असली तरी, रोजगार मोठ्या प्रमाणावर गमवावे लागले. ही स्थिती सावरण्यासाठी सरकारला ठोस पावले उचलावी लागणार आहेत. अर्थव्यवस्था आक्रसली गेल्या अर्थसंकल्पापासून अर्थव्यवस्थेचा आकार आक्रसत गेला आहे. साधारण जीडीपी २.२४ लाख कोटी रुपये असणारी अर्थव्यवस्था आता १.९४ लाख कोटी रुपये जीडीपीची झाली आहे. महसुली उत्पन्नात गजगतीने वाढ दिसून येते आहे. या पार्श्वभूमीवर, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये करोना लसीकरणावर सरकारचा अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. हा खर्च केंद्र, राज्य आणि नागरिक यांच्यात विभागला जाण्याचीही शक्यता आहे. याचाच अर्थ एखादा उपकर वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असा असेल अर्थसंकल्प - अर्थसंकल्प लोकसभेत सकाळी ११ वाजता सादर होणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे भाषण एक वाजेपर्यंत चालेल अशी शक्यता आहे. - अर्थसंकल्प कागदी स्वरूपात उपलब्ध होणार नाही. तो सॉफ्टकॉपी स्वरूपात उपलब्ध होईल. - अर्थसंकल्प सादर झाल्यावर वित्त विधेयक मांडले जाईल. त्यानंतर अर्थसंकल्प वेबसाइटवर दिसू लागेल
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oFt1QJ
No comments:
Post a Comment