Breaking

Sunday, January 31, 2021

लोकल ट्रेन सुरू होताच मुंबई मेट्रोनेही वेळ बदलली! https://ift.tt/3j6jKQx

म. टा. प्रतिनिधी, मुंबई वर्सोवा ते घाटकोपर आज, सोमवारपासून एक तास आधी सुरू होणार आहे. मर्यादित वेळेत सर्वांसाठी सुरू झाल्यानंतर मेट्रोने हा निर्णय घेतला. मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारी एकमेव मेट्रो मुंबईत धावत आहे. यामुळे लोकल सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रोच्या प्रवासी संख्येत ही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. () वाचा: सोमवारपासून वर्सोवा येथून घाटकोपरसाठी पहिली मेट्रो सकाळी ६.५० वाजता सूटणार आहे. घाटकोपरहून वर्सोवासाठी पहिली मेट्रो सकाळी ७.१५ ला सुटणार आहे. शेवटच्या मेट्रो वेळामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वर्सोवा-घाटकोपर शेवटची मेट्रो गाडी रात्री ९.५०ला तर घाटकोपरहून शेवटची मेट्रो १०.१५ला सुटेल, असे मेट्रो वनच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी वर्सोवा-घाटकोपर पहिली मेट्रो ७.५०ला रवाना होत होती. मेट्रो आणि रेल्वे स्थानकांतील गर्दी नियोजनासाठी १ फेब्रुवारीपासून अंधेरी आणि घाटकोपर रेल्वे स्थानक ते मेट्रो स्थानक असा पादचारी पुलाचा मार्ग खुला करण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकावरून अंधेरी पश्चिमेला जाणारा मार्गही खुला करण्यात येईल, असे ही मेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले. वाचा: मेट्रो १वर सध्या दिवसाला २३० फेऱ्या होतात. दर सहा ते आठ मिनिटांनी मेट्रो प्रवासासाठी उपलब्ध होते. लॉकडाउन काळात बंद असलेली मेट्रोसेवा १९ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. सध्या रोज ८० हजार प्रवासी मेट्रोतून प्रवास करत आहेत. लोकल सुरू झाल्यानंतर हा आकडा लाखांपार जाण्याची शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3appMrT

No comments:

Post a Comment