ठाणे: रेल्वे रूळ दुरुस्त करणारी मशिन रुळावरून घसरून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर तिघे जखमी झाले आहेत. या अपघातानंतर मध्य रेल्वेची अंबरनाथहून कर्जतच्या दिशेनं जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागणार असल्यानं प्रवाशांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. ( Services Disrupted) वाचा: अंबरनाथ-बदलापूर दरम्यान मंगळवारी रात्री हा अपघात झाला. त्यात रेल्वेचे तीन कामगार जखमी झाले व एकाचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही मशिन बाजूला करण्याचं काम सुरू असून त्यासाठी दोन ते तीन तास लागणार आहेत. त्यानंतरच रेल्वे वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. करोनाच्या लॉकडाऊननंतर बंद करण्यात आलेली रेल्वे वाहतूक हळूहळू सुरू होत आहे. सर्वांसाठी लोकल अद्याप सुरू झालेली नाही. महिला, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सरकारी कर्मचारी व राज्य सरकारची परवानगी असलेल्या कर्मचाऱ्यांनाच रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा आहे. २९ जानेवारीपासून पश्चिम रेल्वे पूर्ण क्षमतेने मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एक आढावा बैठक घेण्यात आली होती. करोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेलं नसल्यानं गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा कशी सुरू करता येऊ शकते, यादृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर लोकल सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पश्चिम रेल्वेनं महत्त्वाची घोषणा केली आहे. २९ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेनं लोकल चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. मध्य रेल्वेने अद्याप असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, येत्या एक दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Mq0RMk
No comments:
Post a Comment