नवी दिल्ली : बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत घडलेल्या हिंसेत एका आंदोलकाचा मृत्यू झालाय तर ८६ पोलीस जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर रॅलीसाठी नियोजित मार्गावरून न जाता दुसऱ्या मार्गानं लाल किल्ल्यापर्यंत पोहचणाऱ्या आंदोलनकर्त्यांना किल्ल्यातून बाहेर काढण्यात आलंय. तसंच संपूर्ण किल्ल्यात मोठ्या संख्येनं सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मेट्रो स्टेशनवर प्रवेश रोखण्यात आला आहे. बाहेर पडण्याची मात्र परवानगी दिली जातेय. इतर मेट्रो स्टेशनवर सेवा सुरळीत सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकरबा चौक, गाझीपूर, आयकर कार्यालय, सीमापुरी, नांगलोई टी पॉईंट, टिकरी सीमा आणि लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेच्या प्रकरणात ८६ पोलीस जखमी झाले आहेत. आठ सार्वजनिक बसेसची तोडफोड करण्यात आली तर १७ खासगी गाड्यांनाही नुकसान सहन करावं लागलंय. गाझीपूर, सिंघु आणि टिकरी सीमेवर आंदोलनकर्त्यांकडून पोलीस बॅरिकेडस् तोडण्यात आले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ta4lnc
No comments:
Post a Comment