Breaking

Saturday, January 30, 2021

... म्हणून लोकल सुरु झाल्यानंतर १०० एसटी बस जाणार माघारी https://ift.tt/3crjcDJ

म. टा. प्रतिनिधी, सोमवार, १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याने १०० मुंबईकरांच्या वाहतुकीतून माघारी बोलावण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या एसटी बस पुन्हा आपल्या मूळ आगारात जाणार असल्याने मुंबईकरांच्या सुमारे २०० फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी एक हजार एसटी बस बेस्टच्या मार्गांवर धावत आहेत. शहरांतील विविध मार्गावर त्यांच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत. मात्र लॉकडाउन काळात सर्वांसाठी रेल्वे वाहतुकीवरील निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले असून उद्या, सोमवारपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होत आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने एसटीच्या बस मुंबईतील वाहतुकीतून कमी करण्यात येणार आहेत, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईबाहेरून आलेल्या चालक-वाहकांची राहण्याची सोय ओयो रुम्स आणि कासा होम्स या ठिकाणी करण्यात आली होती. महामंडळाने त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करत, हे कर्मचारी पुन्हा आपापल्या विभागांत परत जाणार आहेत, यामुळे ३१ जानेवारीपासून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहे. कमी करण्यात आलेल्या एसटी बस रायगड, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि लातूर या विभागात पाठवण्यात येतील. त्यानंतर स्थानिक विभागातील दैनंदिन फेऱ्या सुरू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. चार आगारांतून सुटी या पार्श्वभूमीवर, काळा किल्ला, मालवणी, मालाड आणि मागठाणे या बेस्ट आगारातील प्रत्येकी २५ गाड्या कमी करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे. १ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे महामंडळाच्या वाहतूक विभागाने स्पष्ट केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2NItmW8

No comments:

Post a Comment