मुंबई : आज सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दराबाबत सावध पवित्रा घेतला आहे. आज सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला. सलग पाच दिवस कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे तूर्त ग्राहकांना दिला मिळाला आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस कंपन्यांनी इंधन दरवाढ केली होती. आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.८० रुपयांवर स्थिर आहे. एक लीटर डिझेल ८३.३० रुपयांना मिळत आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८६.३० रुपये आहे. डिझेलचा भाव ७६.४८ रुपये आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८८.८२ रुपये असून डिझेल ८१.७१ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८७.६९ रुपये असून डिझेल ८०.०८ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८९.२१ रुपये असून डिझेलचा भाव ८१.१० रुपये आहे. राज्यात अहमदनगरमध्ये पेट्रोल ९३.१८ रुपये आहे. नांदेडमध्ये सर्वाधिक ९४.८४ रुपये इतका पेट्रोलचा भाव आहे. पुण्यात ९२.८३ रुपये दर आहे. तर ठाण्यात ९२.४४ रुपये इतका दर आहे. नव्या वर्षातील पहिल्या महिन्यात पेट्रोल २.५९ रुपयांची वाढ झाली आहे. जानेवारीत कंपन्यांनी १० वेळा पेट्रोल दरात वाढ केली. यामुळे जवळपास सर्वच प्रमुख शहरांत पेट्रोल विक्रमी पातळीवर गेले. गेल्या १० महिन्यात पेट्रोलमध्ये सरासरी १६ रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलबरोबर डिझेलदेखील ग्राहकांचे कंबरडे मोडत आहे. जानेवारी १० वेळा डिझेलमध्ये दरवाढ झाली असून त्यात २.६१ रुपयांची वाढ झाली आहे. मागील १० महिन्यात डिझेल ४ रुपयांनी वाढले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ५५ डॉलर खाली आला आहे. अमेरिकेत क्रूडचा भाव प्रती बॅरल ०.१७ ने घटला आणि ५२.०३ डॉलर झाला. तर ब्रेंट क्रूडचा भाव ०.०८ डॉलरने घसरून ५४.९६ डॉलर झाला. २०२० मध्ये जागतिक पातळीवर कच्च्या तेलाची मागणी दररोज ९२.२० दशलक्ष बॅरल इतकी होती. गेल्या वर्षी कच्च्या तेलाचा भाव शुन्याखाली गेला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3r6wU2Y
No comments:
Post a Comment