म. टा. प्रतिनिधी, मोहिमेच्या तिसरा टप्प्यात ४५ ते ५९ वयोगटातील व्याधीग्रस्त () व्यक्ती आणि ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणीसाठी उद्या (सोमवारी) 'कोविन अॅप २.०' हे नवीन व्हर्जन लाँच केले जाणार आहे. लस घेण्यासाठी इच्छुकांना या अॅपवर स्वतः नोंदणी (सेल्फ रजिस्ट्रेशन) करता येणार आहे. अॅपवर नोंदणी करणे शक्य नसल्यास जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. (Register Your Name For Covid Vaccination On cowin) नोंदणी झाल्यानंतर सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर मोफत; तर केंद्राच्या आरोग्य योजना (सीजीएचएस), आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना आणि राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न खासगी रुग्णालयात सशुल्क लस घेता येणार आहे. अशी असेल नोंदणीची प्रक्रिया स्वत: नोंदणी करणे: 'कोविन २.०' किंवा आरोग्य सेतू पोर्टलवरून किंवा अॅप डाउनलोड करून लसीकरणासाठी स्वतः नोंदणी करता येणार आहे. एका मोबाइल क्रमांकावरून चार लाभार्थ्यांची नोंदणी करता येणार आहे. 'ओटीपी व्हेरिफिकेशन'नंतर लाभार्थ्याचे कोविन अकाउंट उघडण्यात येणार असून, त्यावर नाव, जन्माचे वर्ष, लिंग आदी तपशील भरावा लागणार आहे. या प्रक्रियेदरम्यान जवळचे सरकारी किंवा खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्र, तारीख व वेळ निवडता येणार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी स्लिपची प्रिंट काढता येणार आहे; तसेच लाभार्थ्यांच्या मोबाइलवर मेसेज देण्यात येणार आहे. वाचा: केंद्रांवर नोंदणी: अॅपवरून नोंदणी शक्य नसल्यास जवळच्या सरकारी किंवा खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी (ऑन साइट रजिस्ट्रेशन) करता येणार आहे. त्याचे वेळापत्रक लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. लाभार्थी आपल्या सोयीने लसीकरणाचा स्लॉट निवडू शकतो. नोंदणी झाल्यानंतर केंद्रावर लस उपलब्ध असल्यास ती लगेच घेता येईल. नोंदणी व लसीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे - आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र - वयाचा पुरावा आणि छायाचित्र असलेले अधिकृत ओळखपत्र - ४५ ते ६० वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्तींना (को-मॉर्बिड) नोंदणीकृत डॉक्टरांचे सर्टिफिकेट लागणार असून, त्याचा नमुना केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी करताना व्याधीग्रस्त व्यक्तींना आजाराची माहिती द्यावी लागणार आहे. आरोग्य व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनाही संधी लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दोन टप्प्यात लस घेण्यापासून वंचित राहिलेल्या आरोग्य व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनाही ऑन साइट रजिस्ट्रेशन करून लस घेता येणार आहे. लसीकरण केंद्रावर... - नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड तपासून पडताळणी केली जाणार. - आधार क्रमांक पडताळणी शक्य नसल्यास लाभार्थ्याचे छायाचित्र असलेले ओळखपत्र तपासले जाणार. - त्यानंतर लाभार्थ्याला लस दिली जाणार आणि त्याची नोंद कोविन अॅपवर केली जाणार.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37XBoBJ
No comments:
Post a Comment