म. टा. प्रतिनिधी महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव यांची निवड करण्यात आली आहे. गिरीस्थान नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. माथेरानमध्ये पर्यटन वाढावे, पर्यटनस्थळ म्हणून येथील नावलौकिक वाढावा यासाठी ते प्रयत्नशील असतील. विशेष म्हणजे, बांदेकर यांनी विनामोबदला हे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. वाचा: मुंबई-पुण्याहून जवळ असलेल्या माथेरानला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नसलेल्या माथेरानमध्ये पर्यटन हाच मुख्य व्यवसाय आहे. यापूर्वी माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक यांची तीन वर्षांकरीता नियुक्ती करण्यात आली होती. येत्या जुलै महिन्यात त्यांचा हा कालावधी संपत आहे. तसेच प्रकृतीमानानुसार त्यांना हे शक्य होत नसल्याचे सांगत माथेरान नगरपरिषदेने महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांची यासाठी निवड केली. माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते बांदेकर यांना हे पत्र देऊन त्यांना नगरपरिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. वाचा: वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3bPI2eu
No comments:
Post a Comment