वृत्तसंस्था, बलिया : प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर, उत्तर प्रदेशात संशयित आंदोलकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी २०० पेक्षा जास्त ट्रॅक्टर मालकांना बजावली आहे. तर, पोलिसांची ही कारवाई शेतकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोविंद चौधरी यांनी केला आहे. दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती आणि या रॅलीमध्ये हिंसाचार झाला होता. त्यावरून, शेतकऱ्यांवर दबाव आणण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप आहे. मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत. पोलिस स्थानकाच्या हद्दीतील २२० ट्रॅक्टर मालकांना नोटिसा बजावण्यात आले आहेत. हे ट्रॅक्टर सार्वजनिक रस्त्यांच्या व्यावसायिक कामांसाठी वापरण्यात येत होते आणि अल्पवयीन मुले हे ट्रॅक्टर चालवत होते. त्यातून काही अपघात झाले आहेत. तसेच, काही ट्रॅक्टर अवैध खाणकामांसाठीही वापरण्यात येत होते, असे सिकंदरपूर पोलिस स्थानकांचे प्रमुख बालमुकुंद मिश्रा यांनी सांगितले. हे शेतकरी ट्रॅक्टरसह रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि शेतकऱ्यांची चळवळ दडपण्यासाठीच या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असा आरोप राम गोविंद चौधरी यांनी केला. कडेकोट बंदोबस्त गाझियाबाद सीमेवर शेतकरी आंदोलनासाठी परतलेले शेतकरी पुन्हा दिल्लीच्या सीमांवर परतू लागल्याने दिल्लीच्या सीमांवरील बंदोबस्त सोमवारी रात्रीपर्यंत आणखी वाढवण्यात आला. शेतकरी आंदोलनाचे हे नवे केंद्र बनल्यामुळे या भागामध्ये पोलिसांनी मोठी बॅरिकेड्स, सिमेंटचे ब्लॉक, पोलिसांची वाहने लावण्यात आली आहेत. दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथून या भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलक दाखल होत आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केलेल्या आवाहनानंतर या भागात वाढणारी शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून, शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येण्यापासून रोखले जात आहे. इंटरनेट स्थगितीला मुदतवाढ दिल्लीच्या सिंघू, गाझीपूर, तिक्री या सीमांवरील इंटरनेट सेवा खंडित करण्याच्या निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयाने दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली. कृषी कायद्यांविरोधात सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे. प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलनस्थळांवरील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. चार मेट्रो स्टेशन बंद उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथे असलेल्या आंदोलनामुळे चार मेट्रो स्टेशनवरील सर्व प्रवेशद्वार बंद ठेवण्याचे आदेश दिल्ली मेट्रो महामंडळाने घेतला आहे. ब्रिगेडियर होशियार सिंह, बहादुरगड सिटी, पंडित श्रीराम शर्मा आणि तिक्री सीमा ही चार स्टेशन बंद ठेवण्यात आली आहे. तसेच, या मार्गावरून दिल्लीतून उत्तर प्रदेशात जाणारी वाहतूक अक्षरधाम येथून नोयडाच्या दिशेने वळविण्यात आली आहे. या सीमेवरील बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. २५० ट्विटर खाती 'ब्लॉक' कृषी कायद्यांविरोधात खोटी आणि भावना भडकावणारी विधाने पोस्ट करणारी २५० ट्विटर हँडल ब्लॉक करीत असल्याचे ट्विटरने सोमवारी स्पष्ट केले. या ट्विटर खात्यांवर कारवाई करण्याची मागणी केंद्र सरकारने 'ट्विटर'कडे केली होती. ब्लॉक करण्यात आलेल्या खात्यांमध्ये किसन एकता मोर्चा आणि भारतीय किसान युनियन एकता संघटन या खात्यांचाही समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नवी दिल्लीतील आंदोलनाच्या संदर्भाने कारवाईची मागणी केली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2NT8o73
No comments:
Post a Comment