Breaking

Tuesday, February 23, 2021

'राज्यात करोना खरेच वाढलाय की औषध कंपन्यांसाठी...' https://ift.tt/2ZMpJBf

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यात खरेच वाढल्याची परिस्थिती आहे, की औषधनिर्मिती कंपन्यांसाठी काही विशेष बाब आहे, असा सवाल उपस्थित करीत मनसे नेते यांनी मंगळवारी राज्य सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. एकीकडे भव्यदिव्य ट्रॅक्टर रॅली काढतात, तर दुसरीकडे लाँग मार्च काढतात. यावेळी करोना पसरत नाही का? त्यामुळे सध्या जे काही निर्बंध लादण्यात आले आहेत, यामागे औषध कंपन्यांसाठी काही विशेष बाब तर नाही ना, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. वाचा: पत्रकार परिषदेत बोलताना नांदगावकर यांनी हा सवाल केला. 'राज्यात करोना कालावधीत मोठ्या प्रमाणात औषधांची निर्मिती झाली आहे. ही औषधे सध्या विकली जात नाहीत अशी परिस्थिती आहे. मागच्या काही दिवसांचा विचार केला तर अचानक मुंबईसह महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले आहेत. ही बाब महाविकास आघाडीतील नेते नाना पटोले आणि भाई जगताप यांना देखील सांगा, अशी माझी विनंती आहे. एकीकडे नाना पटोले भव्यदिव्य ट्रॅक्टर रॅली काढतात, तर दुसरीकडे भाई जगताप लाँग मार्च काढतात. यावेळी करोना पसरत नाही का', असा सवाल त्यांनी केला. वाचा: सध्या जे काही निर्बंध लादण्यात आले आहेत, यामागे औषध कंपन्यांसाठी काही विशेष बाब तर नाही ना? कारण करोना काळात मोठ्या प्रमाणात औषधे निर्माण करण्यात आली आहेत. परंतु या औषधांच्या साइड्स इफेक्ट्समुळे ही औषधे खरेदी करण्यासाठी नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या हिताचा तर यामागे विचार नाही ना, अशा शब्दांत नांदगावकर यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37F8y92

No comments:

Post a Comment