म. टा. प्रतिनिधी, मुंबई मुंबई शहरचे पालकमंत्री यांच्या बॉडीगार्डवर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविवारी अस्लम शेख एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अंधेरी वर्सोवा येथील एका गुरुद्वारामध्ये जात असताना ही घटना घडली. पालकमंत्री अस्लम शेख यांचा ताफा पुढे जात असताना त्यांचे दिगंबर पानसरे यांच्या लक्षात आले की, रस्त्यात एक दुचाकी उभी होती. ज्यामुळे मंत्री अस्लम शेख यांची गाडी घेऊन जाण्यास अडचण येत होती. त्यानंतर दिगंबर पानसरे हे गाडीतून खाली उतरले आणि दुचाकी काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांची तीन लोकांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की, तिघांनी मिळून दिगंबर पानसरे यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाचा: मंत्र्यांचा बॉडीगार्ड दिगंबर पानसरे यांच्यासोबत धक्काबुक्की-शिवीगाळ करणाऱ्या आरोपींमध्ये एक महिलाही होती. या घटनेनंतर दिगंबर पानसरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्याआधारे पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे. दिगंबर पानसरे दलात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. पोलिस कॉन्स्टेबल दिगंबर पानसरे यांच्या तक्रारीनंतर तीन जणांवर भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3urb3FK
No comments:
Post a Comment