Breaking

Monday, February 22, 2021

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मिळणार 'ही' खास सेवा https://ift.tt/3kcDkLA

म. टा. प्रतिनिधी, मुंबई धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये विना अडथळा अर्थात बफरमुक्त मनोरंजनासाठी आता प्रवाशांना लोकलमध्ये उपलब्ध होणार आहे. मार्चअखेरीस मुंबई लोकलसह मेल-एक्स्प्रेसमध्ये 'कंटेंट ऑन डिमांड' अंतर्गत वायफाय सेवा पुरवण्याचा निर्णय 'रेलटेल'ने घेतला आहे. यामुळे लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना मनोरंजनकाचा नवीन अनुभव घेता येणे शक्य आहे. भारतीय रेल्वेला स्मार्ट रेल्वे बनविण्याकरिता धोरणात्मक बदल करण्यात येत आहे. रेल्वेगाड्यांतून प्रवास करताना प्रवाशांना कंटेंट ऑन डिमांड अतंर्गत सर्फिंग, माहितीपट, चित्रपट, संगीत, गाणी यांचा लाभ घेता येईल. टप्याटप्याने बहुभाषक मनोरंजनाचा पर्याय देखील प्रवाशांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यानी दिली. वाचा: मुंबई लोकलसह, प्रीमियम-मेल-एक्स्प्रेसमध्ये सीओडीनुसार वायफाय सेवा सुरू करण्यात येणार आहे. टप्याटप्यात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात १० ते १२ लोकल गाड्यांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. याचबरोबर चेन्नई एक्स्प्रेसमध्ये देखील या प्रकारच्या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येईल. रेल्वेचा नॉन फेअर रेव्ह्युन्यू वाढवण्यासाठी कंटेंट ऑन डिमांड (सीओडी) प्रकल्पाची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली होती. या प्रकल्पाची अंमलबजवणीची जबाबदारी रेलटेलकडे सोपवण्यात आली होती. वाचा: रेल्वे आणि रेल्वे स्थानकात कंटेंट ऑन डिमांड सेवा देण्यासाठी रेलटेलने मार्गो कंपनीशी करार केला आहे. बहुभाषक माहिती मोफत आणि पैसे देऊन अशा दोन्ही प्रकारात सेवा उपलब्ध असेल, असेही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुंबई लोकलसह निवडक मेल-एक्स्प्रेसमध्ये कंटेंट ऑन डिमांडअंतर्गत मनोरंजनाची सेवा सुरू करण्यात येणार आहे. मार्च अखेरीस या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येईल. - पुनीत चावला, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, रेलटेल


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uwFHOn

No comments:

Post a Comment