Breaking

Tuesday, February 23, 2021

वाढत्या करोनामुळे कोकणवासीयांना वेगळीच चिंता https://ift.tt/3dHCJk6

म. टा. प्रतिनिधी, मुंबई कोकणातील सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा. कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेला शिमगा साजरा होणार की नाही? शिमग्याला गावी जायचे की नाही? असे प्रश्न कोकणवासीयांच्या मनात आहेत. सरकारकडून शिमग्याबाबत स्पष्ट सूचना नसल्याने यात भरच पडली आहे. कोकणवासीयांच्या मनातील भीती लक्षात घेत शिमगा कसा साजरा करायचा? असे प्रश्न कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने उपस्थित केले आहेत. वाचा: यंदा २८ मार्चला होळी आणि २९ मार्चला धुलिवंदन आहे. कोकणात शिमगोत्सवाची तयारी ८ दिवस आधीपासूनच करण्यात येते. झाड आणण्यापासून ते होम करण्यापर्यंत सर्व धार्मिक विधी केले जातात. सर्व नातेवाईक, आप्तस्वकीय-मित्रमंडळी एकत्र येऊन संस्कृती व परंपरा जोपासतात. शिमग्यासाठी रेल्वे, एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्सला मोठी मागणी असते. दरवर्षी शिमग्याच्या महिनाभर आधीपासूनच रेल्वे-बस-खासगी ट्रॅव्हल्सचे आगाऊ आरक्षण केले जाते. सध्या करोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबई-पुण्यात करोनारुग्णांची संख्या वाढत आहे. खेड-रत्नागिरी कोकण परिसरात नवीन करोनारुग्ण सापडत आहेत. यंदा गावी जाण्यासाठी आरक्षण करावे की, मुंबईतून हात जोडून सण साजरा करायचा? हा यक्ष प्रश्न चाकरमान्यांसमोर उभा आहे. राज्यातील करोनास्थिती लक्षात घेता १९ मार्चपासून सुरू होणारा शिमगोत्सव साजरा करण्यासाठी शासकीय तसेच प्रशासकीय नियमावली जाहीर करून परवानगी द्यावी. उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे, सूचना जाहीर कराव्यात. शासनाच्या अटी व शर्थींचे पालन करून उत्सव साजरा करण्यात येईल. याबाबत नियमन ठरवून द्यावे, असे विनंतीवजा निवेदन कोकण रेल्वे प्रवासी संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी सरकारला केले आहे. आरक्षण रद्द करण्यास सुरुवात शिमग्यासाठी कोकणात मुंबईहून ३००-४०० बस हमखास जातात. जाऊन-येऊन बसचे भाडे साधारणपणे ५० हजारांच्या घरात जाते. यंदा या उत्पन्नावर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. पुन्हा लॉकडाउनच्या चर्चेमुळे शिमग्यासाठी आरक्षित झालेल्या खासगी ट्रॅव्हल्स गाड्या रद्द होण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने अद्याप मार्गदर्शक तत्त्वे घोषित केलेली नाहीत. त्यापूर्वीच ही स्थिती आहे, असे मुंबई बस मालक संघटनेचे हर्ष कोटक यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3km7kon

No comments:

Post a Comment