Breaking

Wednesday, February 24, 2021

कोलकात्यात ओवैसींच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली https://ift.tt/3dKzIPG

: च्या पार्श्वभूमीवर 'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन' () प्रमुख यांची गुरुवारी कोलकात्यात रॅली आयोजित करण्यात आली होती. परंतु, या रॅलीला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यानंतर ही रॅली रद्द करण्यात आलीय. पक्षाचे नेते जमीर उल हसन यांनी बुधवारी रात्री ही माहिती दिली. एप्रिल - मे महिन्यात पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एआयएमआयएमच्या प्रचार मोहिमेला यामुळे फटका बसलाय. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असदुद्दीन ओवैसी अल्पसंख्यांक बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेतियाब्रुज भागात रॅली करत पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेला सुरुवात करणार होते. एआयएमआयएमचे प्रदेश सचिव जमीर उल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रॅलीसाठी परवानगी नाकारली आहे. या रॅलीला परवानगी मिळवण्यासाठी पक्षाकडून १० दिवस अगोदरच निवेदन देण्यात आलं होतं. परंतु, पोलिसांनी या रॅलीला परवानगी देण्यात येणार नसल्याचं कळवण्यात आलंय. 'आम्ही तृणमूल काँग्रेसच्या अशा गोष्टींना भिक घालणार नाही. आम्ही चर्चा करून कार्यक्रमासाठी नवी तारीख ठरवू', असंही हसन यांनी म्हटलंय. मात्र तृणमूल काँग्रेसकडून एआयएमआयएमचा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे. ओवैसींच्या रॅलीला परवानगी न मिळण्याचा आणि आपल्या पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं तृणमूलचे खासदार यांनी म्हटलंय. बिहारमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षानं पश्चिम बंगालवर आपलं लक्ष केंद्रीत केलंय. बिहारमध्ये एआयएमआयएमनं २० जागांवर निवडणुका लढवल्या. यापैंकी पाच जागांवर पक्षाला विजय मिळालाय.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uuj2BY

No comments:

Post a Comment