Breaking

Thursday, February 25, 2021

शिवाजी पार्क नुतनीकरण: मनसेने पत्र लिहिताच आदित्य ठाकरेंची 'ही' खेळी https://ift.tt/3dO7ymY

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शिवाजी पार्क मैदानाच्या जलसंचयन नूतनीकरण प्रकल्पाच्या कामात मनसे उडी घेणार असल्याचा अंदाज असल्याने मनसेचा विरोध असतानाही शिवसेनेने संबंधित प्रकल्पासाठी निविदा काढण्याच्या कामाला गती दिली आहे. पर्यावरणमंत्री यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. मनसे अध्यक्ष यांनी स्वत: मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहित शिवाजी पार्क नूतनीकरणाच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया थांबवण्याची विनंती केली होती. शिवाजी पार्क मैदानाची देखभाल करण्यास दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. शिवाजी पार्क मैदानात जलसंचयन प्रकल्प पुन्हा सुरू करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. या प्रकल्पाला चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पालिकेने पैसे खर्च करू नयेत. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा प्रकल्प सामाजिक बांधिलकी निधी अर्थात सीएसआर फंडामधून राबवावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी या पत्रातून केली. आम्ही सीएसआर फंडातून शिवाजी पार्कमध्ये प्रकल्प पर्जन्य जलसंचयन राबवतो. आम्हाला प्रकल्प राबवण्याची परवानगी द्या आणि नूतनीकरण प्रकल्पासाठी सुरू असलेली निविदा प्रक्रिया थांबवा. यापूर्वी आम्ही शिवाजी पार्कवर हा प्रकल्प राबवला आहे, अशी मागणीही या पत्रानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली. त्यावर शिवसेनेकडून या प्रकल्पाच्या कामाची लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. पालिका निवडणुकीआधीच सामना आदित्य ठाकरे यांनी बुधवारी शिवाजी पार्क प्रकल्पाबाबत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेत प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे शिवाजी पार्कमधील या प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेना-मनसे यांच्यात खडाजंगीला सुरुवात झाली आहे. साहजिकच मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीच शिवाजीपार्क परिसरात शिवसेना आणि मनसे यांच्यातील सामना रंगायला सुरुवात झाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3aT0ymT

No comments:

Post a Comment