पुणे : देशाची आर्थिक राजधानी मुंबई ते शत्रूंना जिने अदबीने माना खाली झुकवण्यास भाग पाडले, ती स्वराज्याची राजधानी रायगड हा प्रवास अनोख्या पद्धतीने करण्याची संधी शिवप्रेमींना मिळणार आहे. '' ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, राज्य पर्यटन मंत्रालय यांनी या योजनेला हिरवा कंदील दाखविला आहे. विशेष म्हणजे, 'समृद्ध भारत' योजनेशी महाराष्ट्रातील गडकोटांचा इतिहास जोडण्याची सूचना स्वतः पंतप्रधान यांनी केल्याने गडकोटांच्या विकासाचा नवा अध्याय खुला होणार आहे. वाचा: रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर या योजनेचे सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे, मुंबईच्या 'गेट वे इंडिया' इथून स्पीड बोटीने प्रवास, स्वराज्याच्या खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, हे पाहून महाड येथे जेट्टी थांबा, महाड इथून अवघ्या २३ किलोमीटर अंतर पार करून रायगड गाठणे असे या योजनेचे स्वरूप असेल. पुढे मुंबईहून थेट विजयदुर्ग-सिंधुदुर्ग इथपर्यंतची जलवाहतूक या योजनेशी जोडलेली असेल, असे संभाजीराजे छत्रपती यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि केंद्र सरकार या योजनेसाठीचा निधी देणार आहेत. ही योजना सर्वसामान्य शिवप्रेमींचा विचार करूनच अंमलात आणली जाईल आणि आपल्या इतिहासाबद्दलचा अभिमान द्विगुणित करण्याच्या हेतूने तिची आखणी करण्यात आल्याची ग्वाही, संभाजीराजांनी दिली. 'केंद्रीय पुरातत्त्व खात्याला या योजनेचे तपशील देण्यात आले आहेत. पंतप्रधानांना मध्यंतरी महाराष्ट्रातील गडकोटांची दिनदर्शिका भेट देण्यात आली. यातल्या प्रत्येक गडाचे महत्त्व विषद करणारे पत्र पाठवून पंतप्रधानांनी त्याला प्रतिसाद दिला,' असे इतिहास अभ्यासक मालोजीराव जगदाळे यांनी सांगितले. जलदुर्गांच्या संवर्धनाला चालना... 'सी फोर्ट सर्किट'मुळे सागरी किनारपट्टी; तसेच जलदुर्गांच्या संवर्धनालाही चालना मिळणार आहे. हर्णे बंदराजवळचा सुवर्णदुर्ग, मुरुडजवळच्या कांसा उर्फ पद्मदुर्ग या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आणि इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेल्या जलदुर्गांना जेट्टी नाही. जंजिरा येथील जेट्टीला दुरुस्तीची गरज आहे, या प्रकल्पामुळे तिथे जेट्टी; तसेच इतर आधुनिक जलवाहतुकीच्या सोयी निर्माण होणार आहेत. 'सी फोर्टस् सर्किट' या माध्यमातून देशाची आर्थिक राजधानी ते स्वराज्याची राजधानी सागरी मार्गाने ते ही जलदुर्गांच्या माध्यमातून जोडणे ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असून केंद्रानेही तिला हिरवा कंदील दाखविल्याचा आनंद आहे. - संभाजीराजे छत्रपती, खासदार, अध्यक्ष, रायगड विकास प्राधिकरण
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37pXFI4
No comments:
Post a Comment