मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. सलग दुसऱ्या दिवशी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. काल रविवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच ठेवले होते. त्याआधी सलग १२ दिवस कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली होती. या १२ दिवसात पेट्रोल ३.२८ रुपयांनी महागले आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात पेट्रोल ६.७७ रुपयांनी महागले आहे. मागील १२ दिवसात डिझेल ३.४९ रुपयांनी महागले आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात झालेल्या दरवाढीने डिझेलच्या किमतीत ७.१० रुपये वाढ झाली. आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पेट्रोल ९७ रुपयांवर स्थिर आहे. मुंबईत एक लीटर ८८.०६ रुपये आहे. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८.७६ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.५८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८०.९७ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.५९ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.९८ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९१.७८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.५६ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.६१ रुपये असून डिझेल ८५.८४ रुपये झाला आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडने ६३ डाॅलरची पातळी ओलांडली आहे. अमेरिकेतील हिमवादळाने तेथील कच्च्या तेलाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून किमतीमध्ये तेजी कायम आहे. सिंगापूर एक्सचेंजमध्ये तेलाचा भाव ०.३८ डॉलरने वधारला असून तो ५९.६२ डॉलरवर पोहोचला. तर ब्रेंट क्रूडचा भाव ०.२५ डॉलरने वधारला असून तो प्रती बॅरल ६३.४३ डॉलर झाला आहे. दरम्यान, राजस्थानमधील श्री गंगानगर आणि मध्य प्रदेशातील अन्नुपूर या दोन शहरात साध्या पेट्रोलने शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. याआधी शुक्रवारी देशभरात पेट्रोल ३१ पैसे आणि डिझेल ३३ पैशांनी महागले होते तर गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरात ३४ पैसे आणि डिझेलमध्ये ३२ पैसे वाढ केली होती. ... तर महागाई वाढणार इंधन दरवाढीने लवकरच महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. माल वाहतुकीचे भाडे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिक्षा, टॅक्सी सेवा यांच्या किमान भाडे दरात वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. यापूर्वीच इंधनावरील कर कपात केली नाही तर देशभर चक्काजाम करू असा इशारा माल वाहतूकदारांची शिखर संघटना असलेल्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केंद्र सरकारला दिला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uvwIgi
No comments:
Post a Comment