Breaking

Sunday, February 21, 2021

'आम्ही पंतप्रधानांना फोन लावून थकलो, कुणी फोनच घेत नाही' https://ift.tt/37COx31

म. टा. वृत्तसेवा, शेतकरी आंदोलन तसेच देशातील परिस्थितीवर सोशल मीडिया आणि टूलकिटच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या आणि तिच्यासारख्या कोवळ्या तरुण पिढीला तुरुंगामध्ये टाकत त्यांचा आवाज दाबणारे सरकार मी माझ्या राजकीय आयुष्यात कधी पाहिले नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. अंबरनाथ, बदलापूरमध्ये त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले. ( Attacks Modi Government Over ) वाचा: अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रविवारी अंबरनाथमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. 'नरेंद्र मोदी हे देशाचे कुटुंबप्रमुख आहेत. आपल्या घरातले एखादे मूल नाराज असेल, तर त्याची समजूत काढण्याची जबाबदारी ही कुटुंबप्रमुखाची असते. मोदी संसदेत म्हणाले की, मला एक फोन करा, मी शेतकऱ्यांशी बोलायला तयार आहे. पण आम्ही फोन लावून थकलो, तरी आमचा फोन पंतप्रधान कार्यालयात कुणी घेत नाही,' असे सुळे म्हणाल्या. तसेच याउलट जर तुम्हीच एक फोन शेतकरी नेत्यांना केला, तर ते तुमच्याशी बोलायला येणार नाहीत का, असा सवालही त्यांनी विचारला. वाचा: राष्ट्रवादीतून भाजपत गेलेले जे कार्यकर्ते राष्ट्रवादीत परत येतील, त्यांना पदांसाठी किमान दोन वर्षे वाट पाहायला लावा. सत्तेच्या सावलीत येण्याआधी त्यांना चटके सोसू द्या, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Nr2Kt3

No comments:

Post a Comment