Breaking

Thursday, February 25, 2021

न्यायालयाच्या आवारातच पत्नीला दिला तिहेरी तलाक https://ift.tt/3qYat02

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई पती आणि सासरचे त्रास देतात म्हणून महिलेच्या तक्रारीचे प्रकरण न्यायालयात गेले होते. पत्नीने तक्रार मागे घ्यावी यासाठी पती तिच्यासोबत राहण्यासही तयार झाला होता. मात्र न्यायालयाने त्याच्या आईला म्हणजेच महिलेच्या सासूला अटकपूर्व जामीन मंजूर करताच त्याने न्यायालयाच्या आवारातच तलाक तलाक म्हणत पत्नीला सोडचिठ्ठी दिली. आधीच एका गुन्ह्यात सुनावणी सुरू असताना महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरोधात दिंडोशी पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला. गोरेगाव येथे राहणाऱ्या रुकसाना हिचा २०१३ मध्ये मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या अस्लम (बदललेले नाव) याच्यासोबत निकाह झाला. लग्नानंतर तीन महिन्यांनी अस्लम सौदी येथे कामानिमित्त गेला. सौदी येथे असताना मोबाइलवर अश्लील क्लिप तसेच शिवराळ भाषा वापरून बोलू लागला. काही दिवसांनी परत आल्यानंतर अस्लमने रुकसानाला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. कार घेण्यासाठी माहेरून पाच लाख आणण्यासाठी त्याने तगादा लावला. पैशासाठी मारहाण करू लागल्याने रुकसाना हिने दिंडोशी पोलिस ठाण्यात २०१४ मध्ये पती आणि सासूविरोधात तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी अस्लम याला अटक केली. सुमारे १० महिने तुरुंगात राहिल्यानंतर अस्लम बाहेर आला आणि सुनावणीदरम्यान रुकसानासोबत राहण्याचे त्याने मान्य केले. रुकसानासोबत राहत असताना तो तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत होता, मात्र तिने तक्रार मागे घेतली नाही. वाचा: डिसेंबर २०२० मध्ये अस्लम रुकसाना आणि लहान मुलीला सोडून दुसऱ्या पत्नीकडे निघून गेला. दरम्यान २०१४ मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी दिंडोशी न्यायालयात सुनावणी सुरू होती. रुकसाना हिच्या सासूने या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जानेवारी महिन्यात अस्लम तसेच रुकसाना आणि तिचे कुटुंबीय दिंडोशी न्यायालयाच्या आवारात जमले असतानाच आईला अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याचे अस्लम याला समजले. त्याचवेळी तुझ्यासोबत राहायचे नाही असे सांगून तीन वेळा सर्वांसमोर तलाक बोलून तो निघून गेला. यामुळे रुकसाना हिने पुन्हा पोलिसांत धाव घेतली. अस्लम याच्या विरोधात मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकारांचे संरक्षण कायदा २०१९ तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3bDa1OB

No comments:

Post a Comment