Breaking

Wednesday, February 17, 2021

टेन्शन! मुंबईतील 'या' भागांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढली https://ift.tt/3ubHxDR

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबईत करोनाचा संसर्ग तीव्र असताना, पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील काही भाग हॉटस्पॉट ठरले होते. गेल्या काही महिन्यांत आटोक्यात येत असलेला करोना पुन्हा डोके वर काढत असून, यावेळीही उपनगरांमधील भाग पुन्हा एकदा हॉटस्पॉट ठरले आहेत. बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, या उपनगरांमध्ये उपचाराधीन रुग्णांच्या संख्येचे प्रमाण वाढले आहे. (Corona Cases Increases in Andheri, Borivali, Jogeshwari, Mulund and Chembur) वाचा: मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव नव्याने त्रासदायक ठरतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिकेनेही पुन्हा एकदा करोना नियंत्रणासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत मुंबई पालिकेने ८५ प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केली असून, ९९२ इमारती सील केल्या आहेत. मुंबईत साधारण डिसेंबरनंतर करोनारुग्ण कमी होऊ लागले. त्यापूर्वी दिवसाला दोन ते अडीच हजारापर्यंत करोनारुग्ण आढळत होते. ती संख्या फेब्रुवारीमध्ये ३००च्या टप्प्यात आली. त्यानंतर, १ फेब्रुवारीपासून लोकलसेवा खुली केल्यानंतर गर्दी वाढली. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरण्याचे प्रमाण वाढत गेले आहे. त्यामुळे ३ फेब्रुवारीस ३३४ असलेली सक्रिय रुग्णांची संख्या ६००च्याही वर पोहोचली आहे. त्यात, यापूर्वीही हॉटस्पॉट ठरलेल्या बोरिवलीमध्येही रुग्णसंख्या वाढली आहे. दरम्यान, करोना नियंत्रणात ठेवण्यासाठी काही भागात पालिकेकडून काही इमारतींना प्रतिबंधक उपायांवर भर देण्याची सूचना आहे. १६ फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार बोरिवली - ४१० रुग्ण अंधेरी (पश्चिम) - ३८१ रुग्ण कांदिवली - ३४८ रुग्ण मालाड - ३४६ रुग्ण अंधेरी (पूर्व) - ३४१ रुग्ण कुर्ला - २८३ रुग्ण मुलुंड - २९५ रुग्ण (२०२ इमारती सील) चेंबूर - १७६ रुग्ण वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3beWjkP

No comments:

Post a Comment