Breaking

Wednesday, February 17, 2021

LIVE : आज देशभरात शेतकऱ्यांचा 'रेल रोको', कडक सुरक्षा तैनात https://ift.tt/3bjyGHN

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा तब्बल ८४ वा दिवस आहे. आपला विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी आज देशभरात 'रेल रोको' राबवण्याचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलीय. ''कडून रद्द करण्याची मागणी करत गेल्या आठवड्यात आंदोलनाची घोषणा केली होती. LIVE अपडेट : - दुपारी १२.०० ते दुपारी ४.०० पर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. - पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच रेल्वेकडून सुरक्षा दलाच्या २० अतिरिक्त कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. - रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर रेल्वेगाड्यांच्या संचालनावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विरोधाचे संकेत दिसताच संवेदनशील स्थळांची ओळख केली जाईल, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटलंय. - रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अर्थात RPF चे पोलीस महासंचालक अरुण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाव्यवस्थापकांसोबत एक बैठक घेण्यात आलीय. महाव्यवस्थापक राज्य सरकारांसोबत संपर्कात राहून प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3k1atKo

No comments:

Post a Comment