Breaking

Sunday, February 21, 2021

चोरांनी लुटले अन् पुण्याशी नाळ कायमची तुटली! https://ift.tt/3utkyVh

म. टा. प्रतिनिधी, नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण पुण्यात येतात... स्थायिक होतात... त्यांची पुण्याशी नाळ जोडली जाते. अशाच प्रकारे एक अठरा वर्षांचा तरुण पुण्यात नोकरीसाठी आलेला. आजारी आईला भेटण्यासाठी तो गावी चालला असताना, खासगी बस स्टँडवर त्याला दोघांनी मारहाण करून लुटले. सुदैवाने काही मिनिटांतच पोलिसांनी चोरांना पकडून त्यांनी लुटलेली रोख रक्कमही पीडित तरुणाला परत मिळाली. मात्र, गावी गेल्यानंतर आजारी आईला घडलेला प्रकार सांगितला आणि नोकरीसाठी पुण्याला पुन्हा जायचे नाही, असे आईने बजावले. वाचा: सचिन बब्रुवान जाधव (वय १८, रा. दत्तनगर, कात्रज, मूळ रा. ) या तरुणाबाबत हा प्रकार घडला आहे. त्याचे आई-वडील लातूरला राहतात. आई आजारी असल्याने तो तिला पाहण्यासाठी शनिवारी गावी चालला होता. त्यासाठी पद्मावती येथील खासगी ट्रॅव्हल्स बसची आणि तिकिटाची चौकशी करण्यासाठी तो दुपारी चार वाजता गेला होता. तो बस आणि तिकिटाची चौकशी करत असल्याचे आरोपींनी पाहिले. आरोपींनी त्याला लातूरच्या गाडीचे तिकीट काढून देतो, असे सांगितले. ते संतोषला पद्मावती येथील स्वामी विवेकानंद पुतळ्यासमोरील पार्किंगच्या जागेत घेऊन गेले. तेथे बसच्या आडोशाला नेऊन त्याच्याकडील पाकिट आणि मोबाइल जबरदस्ती काढून घेतला. त्याने एटीएम कार्डचा 'पिन' सांगावा, यासाठी त्याला मारहाणदेखील केली. त्यानंतर त्यांनी पाकिटातील पाचशे रुपये घेऊन तिथून पळ काढला. सचिनने चोरांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37AlAF8

No comments:

Post a Comment