मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा किमतीत घसरण होत आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी इंधन दर कपात केली होती. आज मात्र बुधवारी कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले. पेट्रोल आणि डिझेलची किंमत आज जैसे थेच आहे. सलग चार दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी केला होता. तर आज इंधन दर स्थिर ठेवेल. आज बुधवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.९८ रुपये आहे. ८७.९६ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.५६ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८७ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.५८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.८८ रुपये भाव आहे. आज बुधवारी कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.७७ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.७५ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.५९ रुपये असून डिझेल ८५.७५ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.१३ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर ९८.५८ रुपये आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव कमी झाला आहे. आज सिंगापूरमध्ये ब्रेंट क्रूडचा भाव ०.९८ डॉलरने घसरला. ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ६४.१४ डॉलर झाला. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १. ३२ डॉलरच्या घसरणीसह ६०.५० डॉलर झाला. २६ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेतील कच्च्या तेलाचा साठा ३.९१० दशलक्ष बॅरल आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31Aczsc
No comments:
Post a Comment