Breaking

Monday, March 29, 2021

भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा; चीनने व्यक्त केली 'ही' प्रतिक्रिया https://ift.tt/2QQckah

बीजिंग: भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारत-पाकमधील संभाव्य चर्चेबाबत चीनने आनंद व्यक्त केला आहे. क्षेत्रीय शांती, विकास आणि स्थिरतेच्या दिशेने अधिक सकारात्मक कार्य करण्यासाठी पाकिस्तानसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराने २५ फेब्रुवारी शस्त्रसंधी करार लागू करण्यावर सहमती दर्शवली. त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जनरल कामर जावेद बाजवा यांनी भारतासोबत शांततेची आवश्यकता असल्याचे म्हटले. दोन्ही देशांनी भूतकाळाला मागे सारत पुढं येण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले होते. वाचा: चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेवर आम्हाला आनंद आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेलया सकारात्मक चर्चेचा चीनला आनंदी आहे. वाचा: प्रवक्त्यांनी सांगितले की, क्षेत्रीय विकास, शांतता आणि स्थिरतेसाठी आणखी अधिक सकारात्मक ऊर्जेची आवश्यकता असणार आहे. तर, पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. वाचा: दरम्यान, भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा शांतता चर्चा सुरू होणार असल्याची चर्चा सुरू असताना ताजिकिस्तानमध्ये होणाऱ्या 'हार्ट ऑफ आशिया' परिषदेत भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा होणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी ही शक्यता फेटाळून लावली. बैठकीबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे त्यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dghbsV

No comments:

Post a Comment