मुंबई: बॉलिवूड किंग शाहरुख खाननं नुकतंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. प्रदिर्घ काळापासून चित्रपटांपासून दूर असलेला शाहरुख लवकरच 'पठाण' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण अधूनमधून तो चाहत्यांशी संवाद साधतो या ट्विटर सेशनमध्ये शाहरुखनं त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली होती. ज्यात अनेक चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारले. यातील एका प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखनं त्याचा जवळचा मित्र कोण आहे हे सांगितलं. शाहरुख खाननं काही नुकतंच ट्विटरवर #AskSRK सेशन घेतलं होतं. त्यानं ट्विटरवर लिहिलं, ट्विटरवर '#AskSRK ३...२...१... गो' ज्यानंतर शाहरुख खानला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि शाहरुखनंही त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी एका चाहत्यानं शाहरुखला त्याच्या 'कॉफी विथ करण' शोमधील एका विधानाची आठवण करून देत सध्या त्याचा सर्वात जवळचा मित्र कोण आहे असा प्रश्न विचारला होता. या युझरनं लिहिलं, 'सर तुम्ही 'कॉफी विथ करण' या शोमध्ये एकदा म्हटलं होतं की, तुमचा कोणीच जवळचा मित्र नाही कारण मैत्री सांभाळणं तुम्हाला जमत नाही. तर आताही तुम्हाला असंच वाटतं का?' चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखनं लिहिलं, 'नाही, आता माझी मुलं माझे चांगले मित्र आहेत.' नेहमीच त्याच्या करिअरसोबतच त्याच्या कुटुंबाला सुद्धा महत्त्व देतो. चित्रपटांच्या व्यग्र वेळापत्रकातूनही तो आपल्या मुलांसाठी आवर्जुन वेळ काढताना दिसतो. शाहरुख खान सोशल मीडियावर नेहमीच अशाप्रकारच्या प्रश्नांची उत्तर देताना दिसतो. त्यानं या सेशनमध्ये १५ पेक्षा जास्त चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यानंतर चाहत्यांचा निरोप घेताना त्यानं लिहिलं, 'आता मला गेलं पाहिजे, नाहीतर लोकांना वाटेल की मला काहीच काम नाही आहे. तुम्ही सर्वांनी मला दिलेल्या तुमच्या वेळासाठी धन्यवाद. ज्यांना मी उत्तर देऊ शकलो नाही त्यांनी निराश होऊ नका. अनेकांना मी स्वार्थी आहे असं वाटू शकतं पण असं नाही आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2PHziQi
No comments:
Post a Comment