नवी दिल्लीः भाजप नेते आणि खासदार यांनी केंद्रातील आपल्यालाच सरकारवरच हल्लाबोल केला आहे. यावेळी सुब्रमण्यन स्वामी पाकिस्तानच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनाच लक्ष्य केलं आहे. पाकिस्तान सोबतचा व्यापार पुन्हा सुरू करण्यावर स्वामी सरकारवर टीका केली आहे. काश्मीर मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारने सरेंडर केलं आहे. आता मोदी पाकिस्तानचाही दौरा करतील, असं स्वामी म्हणाले आहेत. काश्मीरवर सरेंडर, इम्रानसोबत डिनर गेल्या काही दिवसांपासून सुब्रमण्यन स्वामी यांनी धोरणांवरून आपल्याच सरकारला टीकेचं लक्ष्य केलं आहे. त्यातच आता त्यांनी आज पाकिस्तानच्या मुद्द्यावर थेट पंतप्रधान मोदींनाच टार्गेट केलं आहे. 'काश्मीर मुद्द्यावर सरेंडर. गुड बाय Pok. मला विश्वास आहे मोदी आणि इम्रान हे लवकरच लंडनमध्ये डिनर करतील', अशी टीका स्वामी यांनी केली आहे. पाकिस्तानची आज बैठक, भारतानेही दिले संकेत भारतासोबत व्यापाराच्या मुद्द्यावर पाकिस्तानमध्ये आज महत्त्वाची बैठक होत आहे. यादरम्यान, भारताने पाकिस्तानसोबत व्यापार सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही देशातील व्यापार बंद आहे. पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंध पुन्हा बहाल करण्याच्या बाजूने भारत आहे. भारताला सामान्य संबंध हवे आहेत. ज्यात पाकिस्तानसह सर्व देशांचा समावेश आहे, असं वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी हे लोकसभेत म्हणाले होते. पाकिस्तानने ऑगस्ट २०१९ मध्ये भारतासोबतचा द्वीपक्षीय व्यापार एकतर्फी निलंबित केला होता. आता या एकतर्फी निर्णयाची समीक्षा करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. पंतप्रधान मोदींच्या पत्राचे इम्रान यांनी दिले उत्तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. काश्मीर मुद्द्यासह दोन्ही देशातील प्रलंबित सर्व मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे, इम्रान खान यांनी म्हटलं आहे. खान यांनी हे पत्र पाकिस्तान दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी दिलेल्या शुभेच्छांच्या उत्तरादाखल लिहिलं होतं.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3sPSZUV
No comments:
Post a Comment